Latur : राज्य सरकारला सुबुद्धी दे, आई तुळजाभवानी चरणी आमदाराचं साकडं!
Latur : राज्य सरकारला सुबुद्धी दे, आई तुळजाभवानी चरणी आमदाराचं साकडं!दीपक क्षीरसागर

Latur : राज्य सरकारला सुबुद्धी दे, आई तुळजाभवानी चरणी आमदाराचं साकडं!

औसा ते तुळजापूर आमदार अभिमन्यू पवार यांची शेतकऱ्यांसह पदयात्रा!
Published on

लातूर : गेल्या महिन्यात मराठवाड्यात पावसानं अक्षरशः कहर केला होता. लातुर जिल्ह्याची सोयाबीनचे कोठार अशी ओळख, पण याच पावसानं महापुराच रुप धारण केलं अन होत्याच नव्हतं झालं. राज्य शासनाने जाहीर केलेली मदत अत्यंत कमी असल्याने औसा येथील भाजपाचे आमदार अभिमन्यु पवार यांनी आज सकाळी औसा ते तुळजापूर शेतकऱ्यांसह पायी यात्रा काढली आहे.

हे देखील पहा :

सन 2019 मध्ये सरकारमध्ये असलेली व्यक्ती हेक्टरी 50 रुपयांची मदत अस सांगत होते. आता त्यांनी फक्त हेक्टरी 10 रुपयांची मदत केली आहे शेतातील सोयाबीन काढण्यासाठी एका बॅगला 5 हजार मजुरी लागत आहे. शेतकरी आता रब्बी हंगामाची तयारी करायची आहेत.

Latur : राज्य सरकारला सुबुद्धी दे, आई तुळजाभवानी चरणी आमदाराचं साकडं!
Crime : विहिरीत मृतावस्थेत आढळला युवक-युवतीचा मृतदेह! घातपात की आत्‍महत्‍या?

अडचणीत असणाऱ्या शेतकऱयांना अधिकची मदत मिळावी, याकरता राज्य सरकारला सुबुद्धी मिळावी यासाठी आई तुळजाभवानीला साकडं घालण्यासाठी ही पायी यात्रा काढली असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले आहे. या पायी यात्रेत प्रभारी जिल्हाध्यक्ष संतोष मुक्ता, ऍड मुक्तेश्वर वागदरे, तालुकाध्यक्ष सुभाष जाधव शहराध्यक्ष लहु कांबळे, जिल्हा सरचिटणीस किरण उटगे, फईम शेख, शैलेश पाटील यांच्यासह अनेक शेतकरी या यात्रेत सहभागी झाले होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com