Jalna Crime News: जालन्यात गावठी दारूचा मोठा साठा जप्त; साहित्य नष्ट करत ८ जणांना अटक

Jalna Crime News: अवैधरित्या गावठी हातभट्टी चालवणाऱ्या आरोपींविरुद्ध कारवाई केली गेली.
Jalna Crime News
Jalna Crime Newsलक्ष्मण सोळुंके
Published On

Jalna Crime News: जालना जिल्ह्यात गावठी दारुच्या हातभट्ट्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जालना अवैधरित्या गावठी दारू (Alcohol) तयार करून विकली जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या टीम आणि पोलिसांनी धाड टाकत मोठा दारुसाठा नष्ट केला आहे. (Jalna Crime News)

Jalna Crime News
Gujarat Assembly Election 2022: भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गडकरी-फडणवीसांवर मोठी जबाबदारी

शहरातील कैकाडी मोहल्ला, सदर बाजार भागातीत ५ आड्यावर तर मंठा तालुक्यातील आष्टीत, घनसावनगी (Jalna) एका अशा आठ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. अचानक टाकलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणात गावठी दारू तयार करण्यासाठी जमिनीत पुरलेल्या ड्रममधील हजारो लिटर सडवा, रसायन नष्ट करण्यात आले. तसेच कोळसा, लाकडं, प्लास्टिक कॅन, टोपले, लोखंडी ड्रम, यांसह हातभट्टीसाठी लागणारे साहित्य असा जवळपास सहा लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त करून साहित उध्वस्त करण्यात आले.

Jalna Crime News
धक्कादायक! कुत्रा भुंकला म्हणून गोळी घालून केलं ठार; बीडमधील संतापजनक घटनेनं खळबळ

अवैधरित्या गावठी हातभट्टी चालवणाऱ्या आरोपींविरुद्ध कारवाई केली गेली. या प्रकरणी आठ आरोपींविरुद्ध कदीम जालना, सादर बाजार, आष्टी आणि घनसावंगी पोलिस ठाण्यात दारू बंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आठ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com