Landslide
LandslideSaam Tv

मुंबई -गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

महामार्गावरील दरड हटवण्याचं काम सुरू आहे.

रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात काल रात्री अकराच्या सुमारास दरड कोसळल्याने (Landslide) घाट पूर्णता बंद पडला होता. महामार्गावरील दरड हटवण्याचं काम सुरू आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्याने या कामाला वेळ लागत आहे. यादरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक चिरणी - आंबडस या पर्यायी मार्गाने वाळवण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक टप्प झाली होती.

हे देखील पाहा -

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच चिपळूणचे प्रांताधिकारी, तहसीलदार, महसूल विभागाचे कर्मचारी आदी घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री १२:३०च्या सुमारास या महामार्गावरील माती हटवण्यात आली आहे. त्याच दरम्यान चिरणी मार्गे वाहतूक वळविण्यात आली होती. परशुराम घाट हा पूर्णपणे धोकादायक झाला असून त्या ठिकाणी प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

Landslide
अंबरनाथच्या महालक्ष्मीनगर चौक खड्ड्यात; पेव्हर ब्लॉक तुटल्यानं रस्त्याची चाळण

मध्यंतरी या घाटाचे काम सुद्धा करण्यात आले होते मात्र पावसाळ्यामुळे सद्यस्थिती कामाला ब्रेक आला आहे. मोठा पाऊस पडला की घाटातील दरड रस्त्यावरती येते त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प होते असाच प्रकार काल रात्री अकराच्या सुमारास घाटात घडला. सद्यस्थितीत घाटातील वाहतूक एकेरी सुरू असून काम करण्यासाठी घाट बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान याआधी देखील मुंबई गोवा महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू असताना दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू देखील झाला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com