तळीयेच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी जमीन मालकाची 'ना हरकत'

तळीयेमधील बेघर कुटुंबाना निवारा देण्यासाठी तातपुरत्या पुनर्वसनासाठी प्रशासनाकडून सुरु असलेले जागा शोधण्याचे काम आता पुर्ण झाले आहे.
तळीयेच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी जमीन मालकाची 'ना हरकत'
तळीयेच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी जमीन मालकाची 'ना हरकत'राजेश भोस्तेकर
Published On

रायगड: संपुर्ण राज्याला हादरवून टाकणारी आणि निसर्गाच्या रौद्ररुपाच दर्शन घटवणारी घटना ज्या तळीये गावा मध्ये घडली ज्यामध्ये कित्येकजन ढिगाऱ्यांखाली मरुन गेलेल तर जे यातून वाचले ते बेघर झाले. याच बेघर कुटुंबाना निवारा देण्यासाठी तातपुरत्या पुनर्वसनासाठी प्रशासनाकडून सुरु असलेले काम आता पुर्ण झाले आहे.तळीयेच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी प्रशासनाकडून पर्यायी जागेची झाली पाहणी केली आहे जमीन मालकीण सुरेखा म्हस्के 'ना हरकत' यांनी प्रशासनाला लेखी दिले आहे.Landlord's 'No Objection' for Temporary Rehabilitation

महाडMahad तालुक्यातील तळीये गावात डोंगराचा भाग कोसळून 84 जणांचा ढिगाऱ्यांखाली दबून मृत्यू झाला. यामध्ये 32 कुटूंबाची घरेही दरडी खाली गेली. त्यामुळे मृताचे नातेवाईक हे बेघर झाले आहेत. या दुर्घटनेनंतर तळीये गावचेTaliye village तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलली आहेत. तळीये गावाजवळच सुरेखा तुळशीराम म्हस्के याची 90 गुंठे खाजगी जागेची पाहणी आज प्रशासनातर्फे करण्यात आली. सुरेखा म्हस्के यांनी तळीये ग्रामस्थांच्या पुनर्सनासाठी 'ना हरकत'No Objection प्रशासनाला तात्काळ लेखी दिले आहे. त्यामुळे या जागेवर तात्पुरते पुनर्वसन केले जाणार आहे.

तळीये येथील जागेची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर, तहसिलदार दिलीप रायन्नावार, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता म्हात्रे, बांधकाम विभागाचे उपअभियंता देशमुख, तळीये गावचे सरपंच संपत तांडलेकर, उपसरपंच महेश मस्के, इतर संबंधित अधिकारी कर्मचारी, आदी उपस्थित होते.

तळीयेच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी जमीन मालकाची 'ना हरकत'
ताफ्यातील वाहन चालकाला सेवानिवृत्ती निमित्त; बालविकास मंत्र्यांचा 'सॅल्यूट'

गावाच्या पुनर्वसनासाठीRehabilitation जी जागा पाहण्यात आली आहे, ती जागा तात्पुरत्या पुनर्वसनाकरिता देण्यासाठी सुरेखा तुळशीराम म्हस्के या संबंधित जागा मालकिणीने त्यांची "नाहरकत" प्रशासनाला तात्काळ लेखी दिली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पाणी, वीज पुरवठा होण्याबाबतची सुविधा उपलब्ध होईल किंवा कसे याबाबतचीही पाहणी पाणीपुरवठा व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केलेली आहे. या जागेस त्यांच्याकडूनही संमती देण्यात आली आहे. या कामाकरिता जिल्हाधिकारी निधी चौधरी व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार दिलीप रायन्नावार हे समन्वयकाची जबाबदारी पार पाडीत आहेत.

Edited By- Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com