Mumbai-Hyderabad bullet train ; भूसंपादनाचे सर्वेक्षण पुर्ण

सोलापूरातील १४, ६४२ शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन होणार
Mumbai-Hyderabad bullet train ;  भूसंपादनाचे सर्वेक्षण पुर्ण
Mumbai-Hyderabad bullet train ; भूसंपादनाचे सर्वेक्षण पुर्ण Saam tv news
Published On

सोलापूर: केंद्रसरकारच्या रेल्वे मंत्रालयाकडून मुंबई-हैदराबाद (Mumbai-Hyderabad) या 721 किलोमीटर लांबीचा हाय स्पीड रेल कॉरिडॉर म्हणजेच बुलेट ट्रेनचा(Bullet train) प्रस्ताव मंजूर झाला. सोलापूर जिल्ह्यातील ६ तालुक्यातील ६२ गावांतून ही बुलेट ट्रेन धावणार आहे. यासाठी या ६२ गावांतील म्हणजेच उत्तर सोलापूर व अक्कलकोट तालुक्‍यात सामाजिक सर्वेक्षण करण्यात आले. (Land Acquisition Survey of Mumbai Hyderabad Bullet Train at Solapur Completed)

Mumbai-Hyderabad bullet train ;  भूसंपादनाचे सर्वेक्षण पुर्ण
पुण्यातील गॅरेजला आग; दोन जण जखमी (पहा व्हिडिओ)

बुलेट ट्रेनसाठी १७.५ मीटर रुंद जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. सदर जागेत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी होणाऱ्या सामाजिक परिणाम व पुनर्वसन यासाठी रेल्वेकडून दोन तालुक्‍यातून सर्वेक्षण करण्यात आले.

हे सर्वेक्षण पुर्ण झाले असून यातील मुंबई ते हैदराबाद ट्रेनसाठी सोलापूर जिल्ह्यातील १४, ६४२ शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन होणार असल्याचं सामाजिक सर्वेक्षणात स्पष्ट झाले. माळशिरस, पंढरपूर, मोहोळ, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींचं भूसंपादन करावं लागेल, अशी माहितीप्रकल्प संचालक संतोष देसाई यांनी दिली आहे.

हैदराबाद बुलेट ट्रेनचा मार्ग उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोटसह माळशिरस, पंढरपूर, मोहोळ, या सहा तालुक्‍यातील ६२ गावांतून प्रस्तावित आहे. यासाठी केंद्रसरकारच्या रेल्वे मंत्रालयाने उत्तर सोलापूर व अक्कलकोट तालुक्‍यात सामाजिक सर्वेक्षण केले. राज्यातील नागरिकांचा रेल्वे प्रवास वेगवान आणि उन्नत करण्यासाठी 'नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड'ने (NHRCL) मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी लिडारमार्फत (Light Detection and Ranging Survey) सर्वेक्षण करण्यात आले.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com