मुंबई आणि जगभरात प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या लालबागच्या राजाचे विसर्जन यंदा रखडलं... लालबागचा राजा विसर्जनसाठी 6 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता गणेशभक्तांच्या जल्लोषात मंडपातून निघाला... लालबागचा राजा पावणेआठच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर दाखल झाला..मात्र समुद्राला आलेल्या भरतीमुळे राजाच्या विसर्जनात नवं विघ्न निर्माण झालं..अनेक गणेशभक्तांनी विसर्जनस्थळी गर्दी गेली..
बाप्पाला अखेरचं डोळेभरून पाहण्यासाठी ही गर्दी थेट महासागराला आव्हानं देताना पाहायला मिळाला..गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट दाटलं..त्यातच लालबागच्या राजाचा पाट जड झाल्यानं आणि हा पाट स्वयंचलित तराफ्यावर चढत नसल्यामुळे लालबागचा राजाचे विसर्जन 30 हून अधिक तास रखडलं असल्याची चर्चाही सुरु झाली...मात्र गेल्या काही वर्षात राजाचं विसर्जन किती तासात झालेली पाहूयात..
दरवर्षी कोळी बांधवांकडून तरफ्यामार्फत राजाचं विसर्जन केलं जात.. मात्र यावर्षी नव्या तराफ्यावर चढवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले.. तर दुसरीकडे मंडळाच्या सचिवांनी ही कोळी बांधवांशी चर्चा करून विसर्जनासंदर्भात माहिती मिळवल्याचे माध्यमांना सांगितले..
लालबागच्या राजाच्या विसर्जनाला वेळ लागल्यानं गणेशभक्तांच्या मनात कालवाकालव सुरु आहे. त्यामुळे काही चुकलं-माकलं असेल तर माफ कर, यापुढे तुझ्या सेवेत हयगय होणार नाही, अशी याचना आता भक्तांकडून केली जातेय... मात्र पहिल्यांदाच विसर्जनात नैसर्गिक संकट धडकल्यानं गणेशभक्तांनीही चिंता व्य़क्त केली..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.