ही दृश्य पाहा....लालबाग राजाच्या चरणी नतमस्तक होणाऱ्या सर्वसामान्य भाविकांना कशी वागणूक मिळतेय... सामान्यांपासून सेलिब्रेटींपर्यंत सर्वचजण राजाच्या चरणी नतमस्तक होत असतात. मात्र राज्याच्या दर्शनात सामान्यांचे हाल होतात तर श्रीमंतांसाठी पायघड्या घातल्या जातात. गेल्या अनेक वर्षांपासून या मंडळाच्या कार्यपध्दतीवर संताप व्यक्त केला जातोय.. कधी कार्यकर्त्यांची, तर कधी सुरक्षारक्षकांची मुजोरी, सामान्यांना धक्काबुक्की आणि सेलिब्रेटींना विशेष वागणूक... सारं काही चीड आणणारं आहे.. यावर्षीही यात काही फरक पडलेला नाहीये.
यावेळी आणखी भर पडली ती विसर्जनाला झालेल्या अभूतपूर्व विलंबाची...गेल्या 9 दशकांत प्रथमच लालबागच्या राजाला विसर्जनासाठी 33 तास लागलेत. याला सर्वस्वी मंडळाचा ढिसाळ कारभार कारणीभूत ठरलाय. राजाची मूर्ती रविवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर दाखल झाली. मात्र भरतीमुळे विसर्जनात विघ्न निर्माण झालं. त्यातच लालबागच्या राजाचा पाट जड झाला. हा पाट अत्याधुनिक तराफ्यावर चढत नसल्यामुळे विसर्जन लांबणीवर पडलं. दरवर्षी कोळी बांधवांकडून तराफ्यामार्फत राजाचं विसर्जन केलं जात. मात्र यावर्षी नव्या तराफ्यावर चढवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. अखेर रविवारी रात्री १० च्या सुमारास विसर्जन झालं. वेळेचं नियोजन चुकल्यानं विसर्जनाचा फज्जा उडाला..
लांबलेल्या विसर्जन मिरवणुकीमुळे सर्वच यंत्रणा वेठीला धरल्या गेल्या..त्यामुळे लालबागच्या राजाला कायदा लागू होत नाही का? महापालिका आणि पोलिस प्रशासन या दिरंगाईबाबत कारवाई का करत नाही ? असे प्रश्न विचारले जातायेत. हा सगळा मंडळाचा आर्थिक प्रभाव म्हणायचा का... ?. माहिती अधिकार कार्यकर्ते महेश वेंगुर्लेकर यांनी यापूर्वी मंडळाच्या गैरकारभाराबाबत धर्मादाय आयुक्तांकडे तक्रारही केली होती. एकेकाळचा मुंबईतल्या कोळ्यांचा हा राजा हळूहळू मंडळाच्या ताब्यात गेला...आता तर उद्योगपती अंबानी ही राजाच्या आश्रयाला आले आहेत. भक्तांनी श्रध्देपोटी लालबागच्या राजाच्या चरणी भरभरुन दान दिल्याने गब्बर झालेले कार्यकर्ते आता कुणालाच जुमानत नसल्याच समोर आलय.
त्यांमुळे आता तासनतास रांगेत उभं राहण्याआधी भक्तांनीही एकदा विचार करायची गरज आहे..कारण शेवटी श्रध्दा महत्वाची....त्यामुळे आता लालबागच्या राजालाच नमस्कार करून सांगावसं वाटत...
माणसांना तुझी आता राहिली नाही नड...
आरं देवा तुझ्या देवळात चोरट्यांचा फड...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.