लाडकीच्या निधीसाठी महायुतीत बिघाडी? दादांच्या कार्यपद्धतीवर शिंदे गटाची नाराजी, विश्वासात न घेतल्याचा शिंदे गटाचा आरोप

Mahayuti Maharashtra : महायुतीत पुन्हा लाडकीच्या निधीवरुन संघर्षाची ठिणगी पडलीय.. एवढंच नाही तर शिंदे गटाने अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर टीका केलीय.. नेमकं काय घडलंय? ही संघर्षाची ठिणगी का पडलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....
Mahayuti Maharashtra
Mahayuti MaharashtraSaam Tv
Published On

लाडक्या बहीणच्या निधीवरुन महायुतीत खडाजंगी सुरु आहे.. त्यातच अजित पवारांनी सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवल्यानंतर शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली होती..मात्र निधीच्या चर्चांवर खुलासा करताना अजित पवारांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून शिंदे गटाला टोला लगावलाय..

अजित पवारांनी शिंदे गटाला डिवचल्यानंतर आता शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावलेंनी अजित पवार निधी वळवताना शिंदे गटाच्या मंत्र्यांना विश्वासात घेत नसल्याचं म्हटलंय....तर हा वाद जास्त वाढण्याची शक्यता असल्याने चंद्रशेखर बावनकुळेंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय..

Mahayuti Maharashtra
ICC T20 क्रमवारी जाहीर, सूर्यकुमार यादवचे नुकसान, तर तिलक वर्माची गगनभरारी, हार्दिक अद्याप...

खरंतर लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली... मात्र महायुती सत्तेत आल्यानंतर तिजोरीवरचा भार कमी कऱण्यासाठी लाडक्या बहीणींना अपात्र करण्याचा सपाटाच लावला.... सरकारने 10 लाख लाडक्या बहीणींना वगळलंच नाही तर लाडक्या बहीणींच्या निधीत 10 हजार कोटींची कपात केलीय... एवढं करुनही निधीचा मेळ न बसल्यानं सरकारने सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा निधी वळवलाय.. त्यामुळे महायुतीत संघर्षाची ठिणगी पडलीय.. त्यामुळे आता शिंदे गटाच्या मंत्र्यांना निधी देऊन अजित पवारांकडून या वादावर पडदा टाकला जाणार की हा वाद आणखी तीव्र होणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

Mahayuti Maharashtra
WTC फायनलमध्ये मोठा डाव टाकला, पण फसला; ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com