Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी जमा होणार? अजित पवार गटाच्या बड्या नेत्यानं तारीखच सांगितली

Ladki Bahin Yojana April Installment to be Credited on Akshaya Tritiya: लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता अक्षय तृतीयेला; योजना बंद होणार नसल्याचे छगन भुजबळ यांचे आश्वासन.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam
Published On

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा १,५०० रुपये जमा केले जातात. मात्र अलीकडे काही विरोधकांनी ही योजना लवकरच बंद होणार असल्याचा दावा केला होता. ज्यामुळे अनेक लाभार्थींमध्ये संभ्रम निर्माण झाला.

मात्र, राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण देत, एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी माहिती दिली आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात अक्षय तृतीयाला जमा होईल, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.

लाडकी बहीण योजनेबाबत छगन भुजबळ म्हणाले, "शासनाचे पैसे आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांना मिळणारच आहेत. सरकार इतरही योजना राबवत आहेत. या योजनेचे पैसेही लाभार्थी जनतेच्या खात्यात जमा होतात. लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचे पैसे मिळण्यास कधी कधी उशीर होतो. पण योजनाच बंद हाईल, असे काहीही नसते.

Ladki Bahin Yojana
Body Massage: बॉडी मसाजच्या नावाखाली 'डर्टी गेम', तरूणींचे अश्लील फोटो काढायचे, व्हायरल करण्याची धमकी देत पैसे लुबाडायचे

आपली कमाई ठरलेली असते. जर रोजच्या खर्चातून एखादा मोठा खर्च जर झाला तर, इतर नेहमीच्या खर्चात ओढाताण होते. हे सर्व सामान्य जनतेला देखील ठाऊक आहे. पण सरकारचे पैसे मिळणारच कुठेही जाणार नाही. ते लाभार्थी जनतेच्या खात्यात जमा होतील", असे छगन भुजबळ म्हणालेत. तसेच एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयाला मिळतील असं सांगण्यात आलंय, तर लवकरच खात्यात जमा होतील", असंही छगन भुजबळ म्हणालेत.

Ladki Bahin Yojana
Shevgaon Crime: दुचाकीच्या साखळीनं मारलं, अंगावर गाडी घातली; ट्रॅक्टर लावण्याच्या कारणावरून दाम्पत्याला बेदम मारहाण

अवकाळी पावसाचा शेतकऱ्याला फटका

सध्या राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. यावर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. शेतीच्या निगडीत वेगवेगळे रिपोर्ट समोर येत आहेत. मला खात्री आहे, शासन निश्चितपणे शेतकऱ्यांना मदत करेल. त्यासाठी मी आता तहसीलदार आणि इतर अधिकाऱ्यांशी बोललो आहे. पंचनामा करण्यासाठी माझ्या तालुक्यात आणि जिल्ह्यात सुरूवात झाली आहे", असंही भुजबळ म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com