Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणी लखपती होणार, देवेंद्र फडणवीसांनी केली मोठी घोषणा

Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojana: महायुती सरकारला सत्तेत येऊन वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्त देवेंद्र फडणवीसांना आणखी एक मोठी घोषणा केली आहे. लाडक्या बहिणींना लखपती करणार, असं त्यांनी म्हटलं आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On
Summary

महायुती सरकारला वर्षपूर्ती

आता लाडक्या बहिणींना लखपती करणार

देवेंद्र फडणवीसांची घोषणा

लाडकी बहीण योजनेचा सुरुवात होऊन दीड वर्ष पूर्ण झाले आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळते. विधानसभा निवडणुकीआधी ही घोषणा सुरु झाली होती. आता महायुती सरकार येऊन एक वर्ष पूर्ण होईल. यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील लाडक्या बहि‍णींना लखपती करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: राज्यात लाडक्या बहिणींना १ लाखाचं अनुदान अन् वीजबिल माफी, सरकारची मोठी घोषणा| VIDEO

देवेंद्र फडणवीसांनी काय म्हटलं? (Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजना सुरु झाली तेव्हा ती बंद होईल, असं बोललं जात होतं. विरोधक लाडकी बहीण योजनेबाबत आरोप करताना दिसत आहेत. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, येत्या ५ डिसेंबरला आमच्या सरकारला एक वर्ष पूर्ण होईल. अनेकजण म्हणाले की, निवडून आल्यावर लाडकी बहीण योजना बंद होईल. मात्र, आता सरकारला एक वर्ष पूर्ण होईल, तरीही योजना बंद झालेली नाही. ही योजना यापुढेही सुरुच राहणार आहे. आता आम्हाला महिलांना लखपती दीदी करायचे आहे, असं त्यांनी सांगितले आहे. याआधीही एक सभेत त्यांनी सांगितले की, आम्हाला ५० लाख दीदींना लखपती दीदी करायचे आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: तुमचा नवरासुद्धा १०० रुपये देत नाही, देवाभाऊंनी १५०० दिले; लाडक्या बहिणींना उद्देशून भाजप नेत्याचं अजब विधान

लखपती दीदी योजना आहे तरी काय? (What is Lakhpati Didi Yojana)

केंद्र सरकारने लखपती दीदी योजना सुरु केली आहे. लखपती दीदी योजनेत महिलांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज दिले जाते. महिलांना ५ लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. कोणत्याही व्याजाशिवाय तुम्हाला हे लोन मिळणार आहे. ही योजना राबवून महाराष्ट्रातील महिलांना लखपती करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद झाली तर राजीनामा देईन, भाजप आमदाराचं मोठं विधान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com