Aditi Tatkare: ती लाडकी बहीण होणार दोडकी; कार, नोकरी असल्यास अर्ज होणार बाद

Majhi Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीण योजनेसंदर्भात मंत्री आदिती तटकरे यांनी दिली महत्त्वाची माहिती. कार, नोकरी आणि कुटुंबातील सदस्य जर कर भरत असतील तर त्यांचा अर्ज बाद होणार.
Aditi Tatkare
Aditi TatkareSaam tv
Published On

लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात प्रचंड गाजली. विधानसभेला मिळालेलं श्रेय महायुती सरकार लाडकी बहिणीला देत आहेत. डिसेंबरचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले असून, अर्जांची छाननी केली जाणार असल्याची चर्चा आहे. अशातच लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. कार, नोकरी असेल तर अर्ज बाद होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना, आदिती तटकरे म्हणाल्या, 'आमच्याकडे अनेक अर्ज आल्या आहेत. ज्यात त्यांनी स्वत:हून अर्ज बाद करण्यास सांगितलं आहे. लग्र झाल्यावर स्थलांतरित, आधार कार्डचा चुकीचा नंबर समाविष्ट होणे, सरकारी नोकरी लागणे, त्यामुळे मी या योजनेस पात्र होत नाही, अशा काही अर्जात महिलांनी सांगितलं आहे. सरसकट सर्व अर्जाची छाननी करणार नाही आहोत. असंही त्या म्हणाले आहेत.

Aditi Tatkare
Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana : लाडकी बहिणीच्या अर्जांची नव्याने छाननी होणार का? आदिती तटकरे यांच्या वक्तव्याने धाकधूक वाढली

उत्पन्नामध्ये वाढ (२.५ लाख), दुचाकी, चारचाकी, आंतरजातीय विवाह, सरकारी नोकरी, आधार कार्ड आणि नावामध्ये फरक असेल आणि लक्षात आणून दिलं असेल, तर या ५ बाबींवर योग्य ती पावलं उचलू असं अदिती तटकरे म्हणालेत. बजेटची जेव्हा घोषणा झाली तेव्हा देखील अडीच कोटी महिलांना लाभ मिळेल असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे निधी वाचवणं हा विषय नाही आहे. असं अदिती तटकरे म्हणाले. त्यामुळे या निकषात जर महिला बसत नसतील तर त्यांचे अर्ज बाद होतील, असं आदिती तटकरे म्हणाले.

Aditi Tatkare
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनी या महिन्यात आधार-बँक अकाउंट लिंक केले तर किती महिन्याचे पैसे येणार ? जाणून घ्या

कुणाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही?

लाडकी बहीण योजनेचा लाभ ज्यांचे अडीच लाखांहून कमी असेल त्यांना मिळेल. ज्या महिलांच्या कुटुंबातील व्यक्ती कर भरत असेल त्यांनाही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या महिला सरकारी कामावर रूजू आहेत, अथवा ज्यांना पेन्शन मिळत आहेत. अशा महिला देखील योजनेसाठी पात्र नाहीत. तसेच कुटुंबातील सदस्य जर आमदार किंवा खासदार असेल तर त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. असं आदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com