Maza Ladka Bhau Yojana: विद्यार्थ्यांसाठी विद्यावेतन योजनेची घोषणा; काय आहे योजना अन् पात्रता

Ladka Bhau Yojana Advantages, Eligiblity, Application Process, Documents: लाडकी बहीण योजनेनंतर राज्य सरकारने आता लाडका भाऊ योजना आणलीय. या योजनेत विद्यार्थ्यांना विद्यावेतन दिलं जाणार आहे. या योजनेसाठी काय पात्रता आहे, हे जाणून घेऊ.
Ladka Bhau Yojana: विद्यार्थ्यांसाठी विद्यावेतन योजनेची घोषणा; काय आहे योजना अन् पात्रता
Ladka Bhau YojanaSaam TV
Published On

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठी मुख्यंमंत्र्यांनी ‘लाडका भाऊ’ योजना जाहीर केली. मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरातून या योजनेची घोषणा केली. त्यामुळे राज्यातील भावांना आता या योजनेचा लाभ घेता येणार आहे. विद्यावेतन योजना काय आहे पाहूया.

विद्यावेतन योजनेची घोषणा

  • 12वी पास विद्यार्थ्यांना 6 हजार रुपये

  • ITI, डिप्लोमाधारकांना 8 हजार रुपये

  • पदवीधरांना 10 हजार रुपये

  • अर्जदाराचं बँक खातं आधारशी जोडलं असणं आवश्यक

अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘लाडकी बहीण’ ही योजना जाहीर करण्यात आली होती. त्याअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. बहि‍णींसाठी योजना, मग लाडक्या भावांसाठी काय, असा प्रश्न विरोधकांनी त्यावर उपस्थित केला होता. मात्र आता राज्य सरकारने लाडक्या भावांसाठीदेखील योजना आणली आहे. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष असणार आहेत ते पूर्ण करुन या योजनेसाठी पात्र ठरता येईल.

लाडका भाऊ योजनेसाठी पात्रता ​?

  • अर्जदार हा मूळचा महाराष्ट्राचा असणं आवश्यक

  • अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्ष असावं

  • शैक्षणिक पात्रता किमान 12वी पास, डिप्लोमा, पदवीधर

  • योजनेसाठी राज्यातील बेरोजगार तरुणच पात्र

दरम्यान, लाडका भाऊ योजना महाराष्ट्राच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षणाचा लाभ देऊन त्यांना रोजगारासाठी सक्षम करण्याचा मुळ उद्देश योजनेचा आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा समजून घ्या.

'विद्यावेतन'साठी ऑनलाइन अर्जाची पद्धत

  • विद्यावेतन योजनेच्या वेबसाईटवर जा.

  • https://mahadbt.maharashtra.gov.in/

  • नवीन वापरकर्ता नोंदणी निवडा.

  • नोंदणी फॉर्ममध्ये माहिती भरा आणि कागदपत्र अपलोड करा

  • नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 'सबमिट'वर क्लिक करा

  • ऑफलाइन पद्धतीसाठी जवळच्या रोजगार सेवा केंद्र अर्ज मिळणार

विद्यावेतन योजनेसाठी कागदपत्रं

  • आधार कार्ड

  • आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर, शैक्षणिक प्रमाणपत्र, सुशिक्षित बेरोजगार प्रमाणपत्र.

  • उत्पन्नाचा दाखला

  • जातीचा दाखला

  • रहिवासी दाखला

लाडकी बहीण योजनेच्या प्रक्रियेत झालेला गोंधळ,महिलांना ताटकळत उभं राहावं लागल्याचं चित्र ताजं आहे. अजूनही पहिला हप्ता खात्यात जमा होण्यासाठी अवकाश आहे. त्यात लाडका भाऊ योजना जाहीर करण्यात आलीये. त्यामुळे पुन्हा गोंधळाची स्थिती उदभवणार नाही याची काळजी सरकारी यंत्रणांना घ्यावी लागेल.

Ladka Bhau Yojana: विद्यार्थ्यांसाठी विद्यावेतन योजनेची घोषणा; काय आहे योजना अन् पात्रता
खुशखबर! लाडक्या बहिणीनंतर आता लाडक्या भावांना मिळणार 12000 रुपये; पंढरपुरातून मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com