Kunal Patil: धुळ्यात काँग्रेसला खिंडार का पडलं? एकनिष्ठ राहणारी घराणी भाजपमध्ये का जाताय? कुणाल पाटलांनी थेट इतिहासचं सांगितला
आजही आजोबा आणि वडिलांनी केलेल्या कामांचा उल्लेख मतदारसंघातील लोक करतात. काँग्रेसनं महाराष्ट्र घडवण्याचं कामे केली. गेल्या तीस-चाळीस वर्षात काँग्रेसनं कामे केली आहेत. पण उत्तर महाराष्ट्राची ज्याप्रकारे प्रगती व्हायला पाहिजे. तशी प्रगती करता आली नाही, असं म्हणत भाजप नेते कुणाल पाटील यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर शरसंधान केलंय.
कुणाल पाटील यांनी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. साम टीव्हीच्या 'ब्लॅक अॅण्ड व्हाईट या कार्यक्रमासाठी त्यांनी मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका केली. धुळ्यात काँग्रेस खिंडार पाडत भाजपनं कुणाल पाटील यांचा पक्षप्रवेश करून घेतला. हा पक्षप्रवेश राहुल गांधींसाठी मोठा धक्का आहे.
कुणाल पाटील यांचे घराणे तीन पिढ्यांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ. तर स्वत: कुणाल पाटील हे राहुल गांधींचे निकटवर्तीय होते. कुणाल पाटील असो किंवा त्यांचे वडील सर्वांनी मंत्रीपदे भूषवली आहेत. तरीही कुणाल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश का केला? असा प्रश्न अनेकांना पडलाय. मतदारांच्या मनातील प्रश्नांची उत्तर कुणाल पाटील यांनी दिले आहेत.
'ब्लॅक अॅण्ड व्हाईट' या कार्यक्रमात बोलताना कुणाल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश का केला याचे कारण सांगताना काँग्रेसच्या कार्यकारणीवर टीका केली. उत्तर महाराष्ट्राला मुख्य प्रवाहात आणण्यात काँग्रेसला यश आले नाहीये. हवा तसा विकास उत्तर महाराष्ट्राचा करता आला नाहीये. इतक्या वर्षात उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्री पद मिळालं नाहीये. मुख्यमंत्री पद मिळाली नसल्यानं हवी असलेली कामे करण्यास ताकद मिळत नाही. राजकीय इच्छा शक्ती असतानाही विकासाची कामे करता येत नाही.
काँग्रेसच्या अपयशाची कारणे सांगताना कुणाल पाटील यांनी त्यांच्या सुरवाडे जामफळ योजनेची माहिती दिली. ही योजना कुमाल पाटील यांच्या वडिलांना १९९९ आणि २००० मध्ये आणली होती. ही योजना मंजूर करण्यासाठी त्यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला पाठवलं होतं. या योजनेसाठी त्यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. पण त्याला निधी मिळाला नव्हता. काँग्रेसची सत्ता असेपर्यंत ही योजना झाली नाही. पण जेव्हा भाजपची सत्ता २०१४ मध्ये आली तेव्हा त्याला निधी मिळाला त्याचे काम देखील सुरू झाले असं पाटील म्हणालेत. अशी विकासाची कामे करण्यासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचं कुणाल पाटील म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.