
मुंबई : कोकणात जात असणार तर बी बातमी नक्की वाचा, पर्यटनासाठी जात असलेल्या प्रवाशांसाठी ही कामाची बातमी आहे. आज मंगळवार ११ फेब्रुवारी रोहा येथे ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम होणार असून रेल्वे उशिराने धावणार आहेत. या ब्लॉकबाबत कोकण रेल्वेच्या माहितीनुसार, रोहा यार्डमधील अप मार्गावरील पॉइंट क्रमांक १२६ ब आणि १२७ एच्या ओव्हरराइडिंग स्विच बदलण्याचं काम केलं जाणार आहे. या कामासाठी मध्य रेल्वेने सकाळी ११.१५ ते दुपारी ३.४५ पर्यंत ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे काम निश्चित कालावधीत जरी करण्यात आलं तर, कोकण रेल्वे पूर्वपदावर येण्यासाठी पुढील काही तासांचा अवधी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील रोहा स्थानकात ओव्हरराइडिंग स्विच बदलण्यासाठी मंगळवारी कोकण रेल्वे ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉकमुळे कोकण रेल्वे उशिराने धावणार आहे. तसेच, या ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांवर परिणाम होणार आहे. विशेष म्हणजे ब्लॉक कालावधीत १६३४६ तिरुवनंतपुरम-लोकमान्य टिळक टर्मिनस-नेत्रावती एक्सप्रेस ही रेल्वे रोहा स्थानकावर दोनदा थांबवली जाणार आहे.
कोणत्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल?
१६३४५ लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस
१६३४६ तिरुवनंतपुरम – लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस
१२६१७ एर्नाकुलम – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस
१९५७७ तिरुनेलवेली – जामनगर एक्सप्रेस
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.