Ganesh Chaturthi: कोकणातील चाकरमान्यांसाठी खूशखबर, गणेशोत्सवाला ट्रेनमधून कार नेता येणार

No More Highway Hassles: गणपतीला कोकणात जायचंय.. ते ही स्वत:ची कार घेऊन, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुमचा प्रवास कमी वेळेत आणि विनाविघ्न होणार आहे. कोकण रेल्वेनं रो रो सेवेच्या धर्तीवर कोणती सेवा सुरु केलीय?
Konkan Railway’s new 'Car on Train' service to transport personal vehicles for Ganesh festival rush – starting from Kolad to Goa.
Konkan Railway’s new 'Car on Train' service to transport personal vehicles for Ganesh festival rush – starting from Kolad to Goa.Saam Tv
Published On

गणपतीत कोकणाक जावूक व्हया.. असं म्हणत कोकणातील चाकरमानी कसाही प्रवास करून कोकण गाठतातच...त्यासाठी तासनतास प्रवासात खोळंबूनही राहतात.... मात्र यावेळी चाकरमान्यांचा हा प्रवास सुखकर होणार आहे. कारण आता चाकरमान्यांना कोकणात स्वत:च्या कारनं जाता येणार आहे. तेही कार न चालवता..तसचं कुठेही वाहतुक कोंडीत न अडकता कारण तुमची कार थेट रुळावरून धावणार आहे... विश्वास नाही ना बसत? मात्र हे खरय..यावर्षीपासून कोकणात स्वत:ची गाडी तुम्ही ट्रेनमधून घेऊन जाऊ त्यासाठी कोकण रेल्वेकडून 'कार ऑन ट्रेन'ची सुविधा उपलब्ध केलीय.

काय आहे 'कार ऑन ट्रेन' सुविधा?

रो- रो सेवेप्रमाणं कार ट्रेनमधून वाहून नेता येणार

एका कारसाठी 7,875 रूपये मोजावे लागणार

यासोबतच तिघांना एसी कोच किंवा एसएलआर डब्यातून प्रवास करता येणार

कारसोबत प्रवाशांना किमान तीन तास अगोदर स्टेशनवर हजर राहवं लागणार

21 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत बुकिंग करता येणार

कोलाडमधून 23 ऑगस्टला तर वेरणा (गोवा) मधून 24 ऑगस्टला सेवाला सुरुवात

11 सप्टेंबरपर्यंत सेवा सुरु राहणार

दरवर्षी 25 ते 30 लाख चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात जात असतात. अनेक वर्षांपासून रखडलेला आणि दुरावस्था झालेला मुंबई-गोवा हायवे चाकरमान्य़ांच्या सहनशक्तीचा अंत पाहत असतो. त्यामुळे कार ऑन ट्रेन ही सुविधा फायदेशीर ठरू शकते..मात्र गणपतीच्या विशेष रेल्वे गाड्याचं तिकीटासाठी झगडावं लागत असताना कार ऑन ट्रेनचं तिकीट तरी मिळणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com