कोकणासह, संपूर्ण महाराष्ट्रात पुढील 24 तासांत जोरदार पावसाची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक भागात पावसाने चांगलेच थैमान घातले आहे.
कोकणासह, संपूर्ण महाराष्ट्रात पुढील 24 तासांत जोरदार पावसाची शक्यता
कोकणासह, संपूर्ण महाराष्ट्रात पुढील 24 तासांत जोरदार पावसाची शक्यताSaam Tv
Published On

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक भागात पावसाने Rain चांगलेच थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी तर पूरपरिस्थिती Flood निर्माण झालेली आहे. अनेक भागात पावसाचे प्रमाण आता कमी झाले आहे, तरी आता बंगालच्या Bengal उपसागरामध्ये कमी दाबाच्या क्षेत्राने पूर्व आणि मध्य भारतात India पावसाचा जोर वाढलेला आहे.

उद्या देखील कोकण Konkan, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र अशा काही भागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून कळविण्यात आले आहे. मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यात पश्चिम भागात काहीसा उत्तरेकडे सरकलेला बघायला मिळत आहे. पण सध्या पूर्व भाग सर्वसाधारण स्थितीवरच राहणार आहे.

हे देखील पहा-

उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सध्या पश्चिम बंगाल आणि बांग्लादेश परिसरावर दिसत आहेत. २ दिवसांत हे कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहार Bihar कडे सरकणार असल्याची सांगितले जात आहे. पण सध्याचा विचार करता, अरबी समुद्राच्या किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाच्या पट्ट्याचा विस्तार कमी झालेला आहे.

कोकणासह, संपूर्ण महाराष्ट्रात पुढील 24 तासांत जोरदार पावसाची शक्यता
कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात वीज पुरवठा लवकरच सुरळीत होईल

तो अगोदर महाराष्ट्राकडून उत्तर केरळ पर्यंत सक्रिय होत होता. आता हवामान खात्याच्या अंदाजानुसार कमी दाबाचे क्षेत्र हे मध्य भारताकडून सरकण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, छत्तीसगड मध्य प्रदेशसह उत्तर भारतात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. दरम्यान अरबी समुद्रावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्यामुळे, पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेश मध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, उद्या कोकणात ठाणे, रत्नागिरी, रायगड, मुंबई, तसेच कोल्हापूर, पुणे Pune आणि सातारा Satara या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. तर दुसरीकडे विदर्भामध्ये देखील बऱ्याच हलका आणि मध्यम पाऊस पडण्याचा, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने यावेळी वर्तविला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com