Koli Samaj Morcha : ...तर कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांना पंढरपुरात पाय ठेवू देणार नाही : काेळी समाजाचा इशारा

येत्या साेमवारी साेलापुरात कोळी समाज बांधव काढणार माेर्चा
Sharad Koli
Sharad Kolisaam tv
Published On

Solapur News : काेळी बांधवांना आदिवासी प्रमाणपत्र मिळविताना हाेणा-या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी अद्याप सरकारने काेणतीही उपाययाेजना केली नाही. यामुळे राज्य सरकार विरोधात साेलापूरात कोळी समाज आक्रमक झाल्याचे पाहयला मिळत आहे. यंदाच्या कार्तिकीला उपमुख्यमंत्र्यांना पंढपुरात पाय ठेवू देणार नाही असा इशारा काेळी बांधवांनी आज (शनिवार) सरकारला दिला. (Maharashtra News)

Sharad Koli
Pune Crime News : पुण्यातील कोयता गँगच्या म्हाेरक्यासह मित्र ठार, पाेलीस तपास सुरु

सोलापुरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात कोळी समाजासाठी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालाची कोळी समाज बांधवांनी राज्य सरकारचा निषेध नाेंदवत होळी केली. कोळी समाज हा सध्या एसटी प्रवर्गात आहे, मात्र कोळी समाज हा आदिवासी आहे की नाही हे तपासण्यासाठी राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामुळे कोळी बांधवांना सध्या आदिवासी सर्टिफिकेट मिळवताना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. या जाचक अटी रद्द करा अन्यथा येत्या कार्तिकीला उपमुख्यमंत्र्यांना पंढपुरात पाऊल ठेऊ देणार नाही असा इशारा कोळी बांधवांकडून देण्यात आला आहे.

Sharad Koli
Pandharpur News : श्रद्धेचा झरा... शेती विकून विठुरायाला 25 तोळ्यांचा सोन्याचा करदोडा, रुक्मिणीस दोन तोळ्याचे मंगळसूत्र

त्याचबरोबर येत्या सोमवारी जवळपास 25 हजार कोळी बांधवांचा धडक मोर्चा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे अशी माहिती शरद कोळी (नेता, कोळी समाज) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

Sharad Koli
Shegoan Pandharpur Highway : पालखी मार्ग दुरस्ती करा, अन्यथा रोड ब्लास्ट करू; मुख्यमंत्र्याच्या गटातील आमदारांचा गर्भित इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com