Kolhapur : लिव्ह इनमधील प्रेयसीचा निघृण खून, छातीत चाकू खुपसला अन् कडी लावून पळाला

Live-in partner murder Kolhapur : कोल्हापूरमधील करवीर तालुक्यात २३ वर्षीय सानिका नरसिंगे हिचा लिव्ह इन पार्टनरने लग्नाला नकार दिल्याने चाकूने भोसकून खून केला. आरोपी सतीश यादव फरार असून, पोलिसांकडून शोध सुरू आहे.
Kolhapur Woman Murdered in Live-in Relationship Over Marriage Refusal | Satish Yadav Absconding
Kolhapur Woman Murdered in Live-in Relationship Over Marriage Refusal | Satish Yadav AbscondingSaam TV News
Published On

girlfriend killed over marriage dispute : लिव्ह इनमध्ये राहणारी २३ वर्षीय समीक्षा ऊर्फ सानिका भरत नरसिंगे हिने लग्नास नकार दिल्याच्या रागातून प्रियकराने तिचा चाकूने भोसकून खून केला. ही घटना कोल्हापूरमधील करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथील अमृतनगर परिसरात भाड्याने राहत असणाऱ्या घरात घडली. हल्लेखोर सतीश मारुती यादव हा पसार झाला असून, त्याच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दरम्यान हल्ले खोराच्या शोधासाठी तीन पथके पोलिसांनी रवाना केली आहेत.

सानिका यापूर्वी 2019 मध्ये लक्ष तीर्थ वसाहतीतील एका तरुणाशी विवाहबद्ध झाली होती. मात्र, सहा महिन्यांतच मतभेदांमुळे दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आणि हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते. याच काळात सानिकाने तिची मैत्रीण आयुष्यासोबत इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय सुरू केला. यातूनच तिची सतीशशी ओळख झाली. तिघेही गेल्या चार महिन्यांपासून सरनोबत वाडीत एका फ्लॅटमध्ये राहत होते. सतीश सानिकावर लग्नासाठी दबाव टाकत होता, परंतु तिला लग्न करायचे नव्हते, ज्यामुळे दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. लग्नाचा हंगाम संपल्याने फ्लॅटचे भाडे परवडत नसल्याने त्यांनी फ्लॅट सोडण्याचा निर्णय घेतला.

चार दिवसांपूर्वी फ्लॅट सोडल्यानंतरही त्यांचे साहित्य तिथेच होते. घरमालकाच्या सांगण्यावरून सानिका आणि आयुष्या साहित्य घेण्यासाठी दुपारी दोन वाजता फ्लॅटवर गेल्या. त्याचवेळी सतीशही तिथे पोहोचला. सानिकासोबतच्या वादानंतर त्याने तिच्या छातीत चाकू खुपसला आणि फ्लॅटला बाहेरून कडी लावून पळून गेला. आयुष्याने सानिकाचा ओरडण्याचा आवाज ऐकला, पण ती मदत करू शकली नाही. तिने सानिकाच्या मित्राला फोन करून माहिती दिली. मित्राने फ्लॅट उघडून सानिकाला रुग्णालयात नेले, पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. गांधीनगर पोलिसांनी पंचनामा करून सतीशच्या शोधासाठी पाच पथके तैनात केली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com