कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणूक रद्द करा; करुणा शर्मांची मागणी (पाहा व्हिडिओ)

कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणूकत आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे.
Karuna Sharma
Karuna SharmaSaam Tv News
Published On

कोल्हापूर - कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणूक (By Election) रद्द करण्यात यावी अशी मागणी करुणा शर्मा यांच्याकडून करण्यात येत आहे. आचारसंहितेचं उल्लंघन झाल्यानं ही निवडणूक रद्द करण्यात यावी, जर ती रद्द झाली नाही तर न्यायालयात जाणार असल्याचा इशारा देखील शर्मा यांनी दिला आहे.

करुणा शर्मा म्हणाल्या, कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणूकत आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे. १० तारखेलाच आचारसंहिता संपली होती तरी देखील काँग्रेस आणि भाजपने आपला प्रचार सुरूच ठेवला. यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे. याशिवाय काँग्रेस आणि भाजपने जाहिरातीसाठी ४० लाखांहून अधिक रुपये खर्च केल्याचा आरोप देखील करून मुंडे यांनी केला आहे. त्याचबरोबर या पक्षांचे लोक इथं पैसे वाटताना पकडले गेले आहेत. त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे असे देखील त्या यावेळी म्हणाल्या.

माझ्याकडे आचारसंहिता भंगाचे पुरावे आहेत. त्यावरून मी कलेक्टर ऑफिसला याची तक्रार दाखल केली आहे. यानंतर मी न्यायालयात जाणार असून मी रिट पिटिशन दाखल करणार आहे. कोल्हापुरात माझा प्रचारच होऊ दिला नाही. मी फक्त २ दिवसच प्रचार केला असा आरोप देखील करून शर्मा यांनी केला आहे. मी हारुनही जिंकणारी बाजीगर आहे, असंही पुढे करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे.

पुढची योजना कशी असेल?

शर्मा म्हणाल्या, केवळ बीडमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकीत मी माझ्या पक्षाचे उमेदवार उभे करणार आहे. पण बीड ते कोल्हापूरवर माझं लक्ष केंद्रीत असेल कारण तिथे माझं मोठं फॅन फॉलोविंग आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com