Kolhapur News
Kolhapur NewsSaam TV

Kolhapur News : ऐन दिवाळीत १४ एकरातील ऊसाची राख; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

विजेच्या खांबावर स्पार्किंग होऊन ऊसाला अचानक आग लागली बघता-बघता या आगीत सुमारे १६ शेतकऱ्यांच्या तब्बल १४ एकरामधील ऊस जळून खाक झाला आहे.
Published on

कोल्हापूर : ऐन दिवाळीत कोल्हापुरातील (Kolhapur) शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. पन्हाळा तालुक्यातील कोलोली इथं विजेच्या खांबावर शॉर्टसर्किट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या (Farmers) ऊसाला आग लागली आहे.

यामध्ये १४ एकरातील ऊस जळून खाक झाला. या आगीत १६ शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले असून ऐन दिवाळीत शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. विजेच्या खांबावर स्पार्किंग होऊन ऊसाला अचानक आग लागली बघता-बघता या आगीत सुमारे १६ शेतकऱ्यांच्या तब्बल १४ एकरामधील ऊस जळून खाक झाला आहे.

पाहा व्हिडीओ -

लवकरच गुऱ्हाळ घरे व साखर कारखाने सुरू होणार होती. पण ऊस जळून गेल्याने दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झालं आहे. दिवाळीच्या सुट्टीमध्येच हा प्रकार घडल्याने व महावितरणचे कर्मचारी सुट्टीवर आहेत.

त्यामुळे जळालेल्या ऊसाचा पंचनामा हा गुरुवारी करण्यात येणार असल्याचे विज मंडळाकडून सांगण्यात आलं आहे. तर पंचनामा लवकरात-लवकर करून नुकसान भरपाई द्यावी व परिसरातील साखर कारखान्याने जळालेला ऊस प्रथम तोडावा अशी मागणी शेतकऱ्यांच्यांतून होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com