
रणजीत माजगावकर, साम टीव्ही
कोल्हापूर : मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा अधिवेशन काळातच आंदोलन छेडू, असा इशारा राज्यातील मराठा संघटनांनी दिला आहे. आज कोल्हापुरात राज्यातील ४२ मराठा संघटनांची एक परिषद पार पडली. या परिषदेमध्ये मराठा आरक्षणाबाबत सविस्तर चर्चा झाली. सरकारशी संवाद साधून जर सरकारने प्रतिसाद दिला नाही, तर आंदोलन छेडू असा निर्णय घेण्यात आलाय.
कोल्हापुरात झालेल्या या परिषदेमध्ये १० टक्के मराठा आरक्षण मिळावं, या मागणीवर ठामपणे चर्चा झाली. या परिषदेत हात उंचावून ११ ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये ओबीसी प्रवर्गाच्या सोयी सवलती आहेत. त्या मराठा समजालाही लागू कराव्यात, हा मुख्य मुद्दा या बैठकीमधून पाहायला मिळाला.
1) महाराष्ट्र शासनाने ओबीसी समाजाला ज्या सोयी सवलती लागू केल्या आहेत. त्या मराठा समाजाला सरसकट लागू करण्यात याव्यात.
2) हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट, बॉम्बे गॅझेटनुसार महाराष्ट्र शासनाकडून अमंलबजावणी करण्यात यावी.
3) महाराष्ट्रामध्ये ओबीसी प्रमाणे एस. ई. बी. सी (मराठा समाज) प्रवर्गातील विद्यार्थीना प्रतिपूर्ती करावयाच्या इतर शुल्काबाबतची सवलत द्यावी.
4) महाराष्ट्रामध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा आणि तालुका पातळीवर समिती गठण करून या समितीमध्ये मराठा समाजाच्या दोन प्रतिनिधींना समाविष्ट करून घ्यावे.
5) महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणारे आणि परराज्यात शिकणाऱ्या ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थीप्रमाणे शिष्यवृत्ती योजना मराठा समाजाला लागू करण्यात याव्यात.
6) महाराष्ट्रात ओबीसी प्रमाणे एसईबीसी प्रवर्गातील युवक युवतींकरिता मोटर वाहन चालक आणि वाहक प्रशिक्षण योजना लागू करण्यात याव्यात.
7) मराठा आंदोलकावर दाखल झालेले गुन्हे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि शासन निर्णयानुसार तपासून मागे घेण्यात याव्यात.
8) मराठा समाजाला एसईबी.सी प्रवर्गा अंर्तगत 10% आरक्षण लागू केले आहे. सध्या ते न्यायप्रविष्ट आहेत. ते राज्य शासनाने न्यायालयामध्ये आपली बाजू भक्कम मांडून आरक्षण टिकवावे
9) मराठा भुषण आण्णासाहेव पाटील आर्थिक विकास महामंडळ हे फक्त मराठा समाजाला लागू करावे. तसेच व्याज परतावा आणि इतर कर्ज प्रकरणे वेळेत पूर्ण करण्यात याव्यात.
10) अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्मारकाचे काम तातडीने चालू करण्यात यावे.
ज्योती मेटे काय म्हणाल्या?
ज्योती मेटे म्हणाल्या की, 'मनोज जरांगे आणि आमचं आंदोलन एकच आहे. मात्र आरक्षणाशिवाय अन्य काही मागण्या करतोय. सरकराने मागण्या मान्यच केल्या पाहिजेत'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.