रणजीत माजलगावर, साम प्रतिनिधी
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत जिल्हाधिकारी घालून दिलेल्या नियमांच्या धिज्जा उडल्यात. कोल्हापूर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी गणेश विसर्जनासाठी डीजे आणि लेझर लाईटवर बंदी घातली होती, परंतु गणेश मंडळांनी जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेले नियम पायदळी तुडवल्याचं दिसून आलंय. अनेक गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि लेझर लाईट लावण्यात आल्याचं दिसून आलंय.
गणेश मंडळांनी नियम धाब्यावर बसल्यामुळे अनेकांना त्याचा त्रास झालाय. डीजेवरील लेझर लाईटमुळे अनेकांच्या डोळ्यांना इजा झाल्या आहेत. काही दिवसापूर्वीच लेझर लाईटमुळे एका तरुणाच्या डोळ्याला इजा झाली होती. त्यानंतर त्यावर पोलिसांनी बंदी घातली होती, मात्र आज विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळांनी पोलिसांच्या सूचना पाळल्या नाहीत..
त्यानंतर कोल्हापूरमधील पोलिसांनी आपला खाक्या दाखवला. गणेश विसर्जन मिरवणुकीत पुढे न सरकणाऱ्या मंडळांवर आणि हुल्लडबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी खक्या दाखवला. दरम्यान, कोल्हापूरचे अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली यांनी १२ सप्टेंबर २०२४ ते दिनांक १७ सप्टेंबर २०२४ या कालावधीमध्ये सार्वजनिक गणेश मंडळांना मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करण्यास प्रतिबंध घालण्यात आला होता.
या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहील, अशी अधिसूचना कोल्हापुरात जारी करण्यात आली होती. तरीही विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईटचा वापर करण्यात आला. आता या मंडळांवर काय कारवाई होते ते ? असा प्रश्न नागरिक करत आहेत.
सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये बाप्पाचं आगमन झाले त्यावेळी कोल्हापुरात धक्कादायक प्रकार समोर आला होता. मिरवणुकीत झगमगाट आकर्षणाचा केंद्र ठरलेल्या ‘लेझर शो’ पाहायला आलेल्या कोल्हापुरातील उचगावमधील आदित्य बोडके या तरुणाच्या डोळ्यातून रक्तस्त्राव झाला. तर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या डोळ्याला गंभीर इजा झाली होती. त्यानंतर लेझर लाईटवर बंदी घालण्यात आली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.