कोल्हापुरात भोंदूगिरीचा कहर, चुटकी वाजवून महिला, पुरुषांवर उपचार

SAM TV Sting Reveals Black Magic: आता बातमी चुटकीवाल्या भोंदूबाबाची....पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरात चुटकी वाजून भूतबाधा उतरवणाऱा भोंदूबाबा समोर आलाय. साम टिव्हीने त्याचा पर्दाफाश केल्यावर प्रशासनाला जाग आली आहे.अनेकजण त्याच्या कारनाम्यांना बळी पडले आहेत
The so-called ‘Chutki Baba’ caught on camera performing black magic rituals in Kolhapur — SAM TV sting exposes his fraudulent practices.
The so-called ‘Chutki Baba’ caught on camera performing black magic rituals in Kolhapur — SAM TV sting exposes his fraudulent practices.Saam Tv
Published On

पाहा या भोंदूबाबाचे कारनामे....मुली, महिला, पुरुषांवर कसे अघोरी उपचार करतोय.

कधी भगवी वस्त्र तर कधी काळी वस्त्र तर कधी अगदी जीन्स पॅन्ट, टी-शर्ट घालून तो जादूटोणा करत असल्याचं व्हिडिओतून स्पष्ट दिसतंय.

छत्रपती शाहू महाराजांचा पुरोगामी जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख... मात्र याच करवीरनगरीत भोंदूगिरीचा कहर झालाय. चक्क चुटकी वाजून भूतबाधा उतरवणा-या या भोंदूबाबाचा साम टीव्हीने पर्दाफाश केलाय. टिंबर मार्केट जवळ या मांत्रिकाने आपलं बस्तान बसवलं होतं. महाकालची शक्ती आणि सिद्धीप्राप्त असल्याचा थापा मारुन याने पिडीतांना भुलवलं होतं. अगदी सुशिक्षित घरातील लोकही याला बळी पडलेत. स्मशानभूमीत चुटकी वाजून अघोरी पूजा करणे. भूत काढणे, करणी करणे यासह अनेक अघोरी प्रकार उघड झालेत. साम टीव्हीने त्याची भोंदूगिरी उघड केल्यानंतर प्रशासनाला जाग आली. लवकरच या चुटकीवाल्या बाबाला ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

गेल्या दहा दिवसांपूर्वीच कोल्हापुरातल्या शिरोली पुलाची या स्मशानभूमीत देखील अघोरी प्रकार सुरू असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे पुरोगामी कोल्हापुरात नेमकं चालले तरी काय ? अशा प्रश्न पडलाय. या भोंदूबाबाच्या जाळ्यात शहरासह ग्रामीण भागातील अनेक जण अडकल्याची माहिती आहे. त्याच्या अघोरी पूजेचे, उपचाराचे व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही या प्रकाराची दखल घेत नागरीकांना अशा गोष्टींना बळी न पडण्याचं आवाहन केलंय.

नुकतंच पुण्यामध्ये राजेंद्र खडके आणि वेदीका पंढरपूरकर या भोंदू गुरु-शिष्या जोडीने उच्चशिक्षित दाम्पत्याची तब्बल 14 कोटींची फसवणूक करुन मालमत्ता हडपली होती. अंधश्रद्धा,जादूटोणा विरोधी कायदा करुनही असे प्रकार मोठ्या शहरातील घडत आहेत. शिक्षित लोकही त्याला बळी पडत आहेत. ही चिंतेची बाब आहे. सर्वच स्तरावर जनजागृती आणि पोलिसांकडून कडक कारवाई झाली तरच अंधश्रद्धेच्या प्रकारांना आळा बसू शकेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com