Kolhapur DCC Bank: असे आहे नवे संचालक मंडळ

पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची आज मतमोजणी होती.
kolhapur district bank election 2022 final result
kolhapur district bank election 2022 final resultSaam Tv
Published On

कोल्हापूर : राजकीय दृष्टया चर्चेत असलेल्या काेल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (kolhapur district central coperative bank election) निवडणुकीची मतमाेजणी पुर्ण झाली आहे. या बॅंकेच्या २१ पैकी सहा संचालकांची बिनविराेध निवड झाली हाेती. आज काेणत्या १५ उमेदवारांना संचालकपदी निवडून दिले हे स्पष्ट झाले आहे. यामध्ये ११ सत्ताधारी, तीन विराेधी तसेच एक अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. (Kolhapur district bank election 2022 final result)

या बँकेच्या निवडणुकीत (kolhapur dcc bank election) सत्ताधारी गटाबरोबर ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) , गृहराज्यमंत्री सतेज पाटील (satej patil), खासदार धैर्यशील माने, राष्ट्रवादीचे (ncp) जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा कस लागला. विरोधी शिवसेनेच्या पॅनेलमध्ये खासदार संजय मंडलिक, बाबासाहेब पाटील, उत्तम कांबळे, शेकापचे क्रांतिसिंह पाटील यांचा समावेश हाेता.

kolhapur district bank election 2022 final result
Republic day: महाराष्ट्राच्या चित्ररथात जैवविविधता; कास पठारासह, शेखरु

आज सकाळपासून एकेक निकाल हाती येताच. विजयी उमेदवारांचे कार्यकर्ते जल्लाेष करीत हाेते. काही भागात तसेच तालुक्यात विजयी उमेदवारांच्या नेत्यांनी फटाक्यांसह गुलाल उधळला. काही ठिकाणी तर उमेदवारांचे अभिनंदनाचे फलक लावण्यास प्रारंभ केला. एकंदरीतच काेल्हापूर (kolhapur) जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर नेत्यांसह कार्यकर्त्यांना काेराेनाचा (coronavirus) वाढता प्रादुर्भावाचा विसर पडल्याचे दिसून आले.

काेल्हापूर जिल्हा बॅंक बिनविराेध झालेले संचालक (kolhapur district central coperative bank)

अमल महाडिक

हसन मुश्रीफ

सतेज पाटील

पी. एन. पाटील

राजेश पाटील

ए. वाय. पाटील

काेल्हापूर जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतील विजयी उमेदवार (kolhapur district bank election 2022 final result)

राजेंद्र पाटील यड्रावकर (सत्ताधारी पॅनल)

विनय कोरे

रणजित पाटील

सुधीर देसाई

संतोष पाटील

स्मिता गवळी

भैया माने

निवेदिता माने

श्रुतिका काटकर

विजयसिंह माने

राजू आवळे

अर्जुन आबिटकर (विराेधी पॅनल)

संजय मंडलिक

बाबासाहेब पाटील आसुरलेकर

रणधीरसिंह गायकवाड (अपक्ष)

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com