
रणजीत माजगांवकर
Kolhapur crime News : कोल्हापूर पोलिसांनी गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात २ ठिकाणी बुधवारी गर्भलिंग निदान प्रकरणी छापे टाकण्यात आले होते. बेकायदेशीर गर्भलिंग निदान तपासणी प्रकरणात आत्तापर्यंत पोलिसांनी नऊ जणांना अटक केलेली आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील मडीलगे आणि राधानगरी इथं आरोग्य विभाग आणि पोलिसांच्या वतीने छापे टाकण्यात आला होता. बोगस डॉक्टर विजय कोळूस्कर आणि श्रीमंत पाटील यांना गर्भलिंग निदान करताना रंगेहाथ पकडले होते.
बेकायदेशीर गर्भ निदान प्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील मोठा रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती. आरोग्य विभाग आणि पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात मडीलगे येथे गर्भलिंग निदानचे मशीन,गर्भपाताची औषधे सापडली होती. राधानगरी मध्येही सोनग्राफी मशीन पकडले होते.या प्रकरणी भुदरगड पोलिसांत पीसीपीएनडिटी कायद्यानव्ये गुन्हा दाखल झाला आहे.
राधानगरीमध्येही सोनग्राफी मशीन पकडले होते. या प्रकरणी भुदरगड पोलिसांत पीसीपीएनडिटी कायद्यानव्ये गुन्हा दाखल झाला आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी इथल्या गर्भ निदान चाचणी प्रकरणी भुदरगड पोलिसांनी काल रात्री आणखी एका एजंटला अटक केलेली आहे.
राधानगरी इथल्या सर्जेराव पाटील या एजंटला बदरगड पोलिसांनी (Police) अटक केलेली आहे. या प्रकरणाची व्याप्ती वाढत असून कोल्हापूर जिल्ह्यातील आत्तापर्यंत नऊ जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे.
कोल्हापूर बनलंय गर्भलिंग निदान चाचणीचं हब
पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड आणि राधानगरी येथील गर्भलिंग निदान चाचणी केंद्राचं बिंग फोडलं. पोलिसांनी या केंद्रावर पेशंट बनून छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना छाप्यात गर्भलिंग निदानासाठी वापरण्यात येणारे मशीन आणि गर्भपाताची औषधे पोलिसांच्या हाती लागली.पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात नऊ जणांना अटक केली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.