पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेली लोककल्याणाकारी कामे जाणून घ्या

Ahilyadevi Holkar Jayanti 2022 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९७ व्या जयंतीनिमित्त त्यांनी केलेल्या लोककल्याणकारी कामांचा घेतलेला थोडक्यात आढावा.
Ahilyadevi Holkar Jayanti 2022, ahilyabai holkar information in marathi
Ahilyadevi Holkar Jayanti 2022, ahilyabai holkar information in marathiSaam Tv
Published On

Ahilyadevi Holkar Jayanti 2022

मुंबई: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज २९७ वी जयंती. (ahilyadevi holkar jayanti 2022) अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. अहिल्यादेवी यांचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी हे गांव होते. त्यांच्या मामांचे आडनाव मैंदाड होते. स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकवले होते. त्यांनी भारतभर केलेल्या लोककल्याणकारी अहिल्यादेवी यांना पुण्यश्लोक म्हणतात. आज त्यांच्या २९७ व्या जयंतीनिमित्त (Birth Anniversary) त्यांनी केलेल्या लोककल्याणकारी कामांचा थोडक्यात आढावा. (Ahilyabai holkar information in Marathi)

हे देखील पाहा -

मोहिमेवर असताना पाहिलेलं दृष्य

त्या काळात एक स्त्री राज्यकारभारच सांभाळत नाही तर युध्दाही करते हे जगाला दाखवून दिले होते. महाराणी अहिल्याईने राज्यकारभार हातात घेतल्यावर पुर्ण भारतात लोककल्याणकारी कामे करण्याचे ठरविले आणि करूनही दाखवले. देशात सामान्य भाविक भक्त तीर्थ यात्रेला जातात तेथे त्याना‌ कसलीही सुविधा नव्हती, पाणी सुध्दा पिण्याची व्यवस्था नव्हती. त्यांना शुद्र म्हणून हिणवलं जात असे, तहान लागली तर वरून पाणी वाढत होते. थाबंण्याची व्यवस्था नव्हती, जेवण्याची व्यवस्था नव्हती, बसायला सावली नव्हती, मंदिरात कोरडा शिधा आणि पैसा घेणारे ब्राह्मण पुजारी, पण कसलीही सुविधा न देता सामान्यांना लुटण्यासाठी बसलेले असत. ते स्वतःला भुदेव समजून घेत असतं. हे दृष्य महाराणी मोहिमेवर असताना त्यांनी प्रत्यक्ष पाहिले होते.

खाजगी मालमत्तेतून लोककल्याणकारी सुविधा

तीर्थाच्या ठिकाणी मंदिरं पुर्वीच होते, काही ठिकाणी पडझड झाली असेल, अशा देशातील साडेतीन हजार सार्वजनिक आणि तीर्थाच्या ठिकाणी महाराणी अहिल्याईने स्वःताच्या खाजगी मालमत्तेतून लोक कल्याणकारी सुविधा देण्याचे ठरविले. प्रत्येक तीर्थाच्या ठिकाणी राहाण्यासाठी धर्मशाळा, पिण्याच्या‌ पाण्यासाठी विहीरी, तलाव, हिमालयात गरम पाण्याचे कुंड, दळण वळणासाठी रस्ते, पर्यावरण आणि सावलीसाठी वृक्षारोपण, कार्यक्रमासाठी सभागृह, बायका पोर, प्रवासी यांचे अपघात टाळण्यासाठी नदीच्या काठावर घाट बांधले आणि भुकेलेल्या लोकांसाठी त्यांनी अन्न छत्रे सुरू केली होती.

समानतेचा हक्क

लोकांच्या सोईसाठी पत्र व्यवहारासाठी टपाल व्यवस्था, शेतकऱ्यांसाठी-बी भरणाची व दुष्काळ निवारण व्यवस्था, व्यापाऱ्यांसाठी सुविधा, कामगारांसाठी उद्दोग धंदे, कलाकारांना राजाश्रय दिला, स्त्री-पुरूष भेदभाव मिटवण्यासाठी महिलांना समानतेचे हक्क व महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी स्त्रियांना सैनिकी शिक्षण देण्याची व्यवस्था, स्त्री-पुरूषांना वाचन कक्ष, वाचन व श्रवणासाठी ग्रंथालयाची व्यवस्था केली. स्त्रियांना जगण्याचा आधार देण्यासाठी विधवा महिलेला दत्तक घेण्याचे व संपती सांभाळण्याचे अधिकार दिले. असेच अधिकार सर्व शुद्र नर- नारीना देण्यात आले होते. असे अनेक लोककल्याणकारी कामे लोकमाता महाराणीने केले होते.

Ahilyadevi Holkar Jayanti 2022, ahilyabai holkar information in marathi
कोरोनाने टेन्शन वाढवलं! मुंबईत सलग पाचव्या दिवशी आढळली मोठी रुग्णसंख्या
मराठी साम्राज्याची सम्राज्ञी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या राज्यात भेदभाव नव्हता सर्वांना समान न्याय मिळत होता. त्यांनी मंदिरे बांधली नसून मंदिराच्या परिसरात लोक कल्याणासाठी कामे केली आहेत, हे समजून घेण्याची गरज आहे. ती हिंदू मुस्लीम भेदभाव मानला नाही किंवा अन्य कोणताही व कसलाही भेदभाव केलेली नाही. असा भेदभाव केला असता तर सैन्यात मुस्लिम फौज व मुस्लिम राज्यात ही लोककल्याणकारी व्यवस्था करू शकली नसती. मुस्लिम राजे तिचा सल्ला घेत होते, तिचा सन्मान करत होते. इंदौरच्या महाराणीने संपूर्ण भारतात ह्या सुविधा देवून भारतातील मराठी साम्राज्याची सम्राज्ञी बनली होती. अशा या महान राजमातेला त्यांच्या २९७ व्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा.

माहितीस्त्रोत: सकाळ

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com