Kishori Pednekar : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात काल 'एसआरए' प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. वांद्रे येथील निर्मल नगर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर एफआयआर दाखल झाली आहे. या प्रकरणी आता किशोरी पेडणेकरांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Maharashtra Politics News)
किशोरी पेडणेकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून वरळी येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील सदनिकांमध्ये घोळ केल्याचे आरोप होत होते. अशात त्यावर काल त्यांच्यावर एफाआयआर दाखल केली गेली. तेव्हापासून किशोरी पेडणेकर यांनी कोणतेही वक्तव्य केले नाही. अशात आता आपल्या ट्वीटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत त्यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे. " एखाद्या अति शहाण्याला उत्तर देण्यापेक्षा नि:शब्द होऊन पुढे गेलं ना की, त्याला त्याची लायकी समजायला वेळ लागत नाही", अशा शब्दांत त्यांनी उत्तर दिले आहे.
नेमकं काय आहे प्रकरण
वरळी येथील झोपडपट्टी पुनर्विकास सदनीका काबीज केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर केला होता. यासाठी त्यांनी अनेक कागदपत्रे देखील सादर केली. तसेच त्यांनी " मुंबई पोलीस निर्मल नगर वांद्रे पूर्व पोलीस ठाण्यात किशोरी पेडणेकर कुटुंब आणि किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध गोमाता जनता एसआरए वरळी मुंबई येथे फसवणूक केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. ", असे ट्वीट केले.
" किशोरी पेडणेकर आणि त्यांचे कुटुंबातील सदस्य फसवणुकीत सहभागी आहेत. किशोरी पेडणेकर,त्यांचा मुलगा साईप्रसाद पेडणेकर ,किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड आणि अन्य चार जणांच्या विरोधात २०१२ मध्ये फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या प्रकरणी समन्स जारी करण्यात आले होते. त्यांच्या कंपनीला कोविड काळाच कोटींचे कंत्राट मिळाले. कोर्टाने आरोपींना ६ फेब्रुवारी रोजी कोर्टात हजर राहण्यास सांगितले आहे.", असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.