Kishori Pednekar
Kishori PednekarSaam TV

Kishori Pednekar: छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगते...; कोविड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?

Kishori Pednekar: ईडी कार्यालयात दाखल होण्याआधी किशोरी पेडणेकरांनी माध्यमांशी संवाद साधलाय. यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधत काही सूचक विधाने केली.
Published on

Mumbai News:

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर कोविड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी सध्या ईडीच्या रडावर आहेत. आज याच प्रकरणी चौकशीसाठी त्यांना बोलावण्यात आलंय. ईडी कार्यालयात दाखल होण्याआधी किशोरी पेडणेकरांनी माध्यमांशी संवाद साधलाय. यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधत काही सूचक विधाने केलीत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kishori Pednekar
Bengaluru Crime : शिक्षणासाठी घर सोडलं, प्रियकरासाठी नवऱ्याला सोडलं; नंतर जोडप्यानं आयुष्य संपवलं, नेमकं काय आहे प्रकरण?

"चौकशीचा भाग म्हणून मला ईडीने बोलावलं आहे. त्यांना सहकार्य करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. त्यामुळे मी आज हजर राहणार आहे. महापौर म्हणून अडीच वर्षात जे काम केले ते मुंबईकरांनी नव्हे तर अख्ख्या जगाने पाहिले आहे.", असं किशोरी पेडणेकर म्हणाल्यात.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी किशोरी पेडणेकरांवर आरोप केले होते. त्यावरून बोलताना त्या म्हणाल्या की, "आता जवाब तो देना ही पडेगा... जवाब फक्त मीच नाही सगळ्यांना देना पडेगा आणि दुसरं म्हणजे आरोप कोण करतात?"

"छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने महाराष्ट्र भूमी पावन झालेली आहे. त्या भूमीत मुंबईत माझा जन्म झाला आहे. छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगेल जे सांगेन ते खरं सांगेन आणि मी कधीही कुठलंही चुकीचं काम केलेलं नाहीये.", असं पेडणेकर यांनी ठामपणे सांगितलं आहे.

आम्ही काम करत होतो तेव्हा कोणी घोटाळा केला असेल तर ते देखील समोर आलं पाहिजे. मी सुद्धा मागणी करेल पण फक्त आरोप करून प्रेशर आणयचं आणि स्वतःची कामे करून घ्यायची हे अजिबात चालणार नाही, असंही पेडणीकर म्हणाल्या.

Kishori Pednekar
Pune Crime News : जागरुक नागरिकांमुळे पाच सशस्त्र दरोडेखोर अटकेत; 5 तोळे सोने, 18 किलो चांदीसह 2 लाख 22 हजार हस्तगत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com