आव्हाड आता तुम्हीही बॅग भरा - किरीट सोमय्यांचा निशाणा

दिवाळीपर्यंत उद्धव ठाकरे यांची इलेव्हन सेना तुरुंगात जाईल, तसेच जितेंद्र आव्हाड तुम्ही आता बॅग भरा, असा इशारा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी येथे दिला.
- जितेंद्र आव्हाड-किरिट सोमय्या
- जितेंद्र आव्हाड-किरिट सोमय्या- Saam Tv
Published On

सांगली : दिवाळीपर्यंत Diwali उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांची इलेव्हन सेना तुरुंगात जाईल, तसेच जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad तुम्ही आता बॅग भरा, असा इशारा भाजपचे BJP माजी खासदार किरीट सोमय्या Kirit Somaiyya यांनी येथे दिला. ठाकरेंच्या इलेव्हन सेनेच्या भ्रष्टाचाराचे Corruption घोटाळे पुराव्यासह उघडकीस आणणार असल्याचंही किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. BJP Leader Kirit Somaiyya allegation on Jitendra Awhad

परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांना ईडीकडून नोटीस देण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी सोमवारी बजरंग खरमाटे यांच्या सांगली जिल्ह्यातल्या तासगाव येथील वंजारवाडी गावासह खरमाटे यांच्या मालमत्ता असणाऱ्या ठिकाणांना भेट दिली. त्यानंतर सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमधून त्यांनी उद्धव ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला.

बजरंग खरमाटे हे परिवहन मंत्री अनिल परब Anil Parab यांचे विशेष सचिव होते..त्यामुळे  40 प्रॉपर्टीची बेहिशोबी साडेसातशे कोटींची मालमत्ता आहे...ती कुठून आली ? याची मागणी आपण केली आहे...तर खरमाटे यांची ही संपत्ती आहे की,अनिल परब यांचा बेनामी पैसा आहे हे लवकरच समोर येईल, पण ठाकरे सरकारांचा एक अनिल तुरुंगाच्या दरवाजावर आहे, तर दुसरा अनिल म्हणजे अनिल परब मुहूर्त काढत आहे, अशा शब्दात सोमय्या यांनी टीका केली.

- जितेंद्र आव्हाड-किरिट सोमय्या
कोस्टल रोडच्या भ्रष्टाचारात शिवसेनेची भागिदारी? -आशिष शेलारांचा सवाल

शिवसेनेवर निशाणा साधताना कॅट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांनी देखील 900 कोटी रुपयांचा घोटाळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशीच केला आहे...असा आरोप करत उद्धव ठाकरे देखील एक घोटाळेबाज आहेत..त्यामुळे या उद्धव ठाकरे यांच्या इलेव्हन सेनेच्या भ्रष्टाचाराचे घोटाळे आपण पुराव्यानिशी उघडकीस आणणार आहोत आणि दिवाळीपर्यंत ठाकरेची इलेव्हन सेना तुरुंगात जाईल, असा दावा सोमय्या यांनी यावेळी केला.

आता अनिल परब यांच्यावर कारवाई झालेली आहे, पुढच्या आठवड्यात भावना गवळींच्या वर कारवाई होणार आणि त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांचाही नंबर असून आव्हाड यांना आपली जाहीर नोटीस असणार आहे, त्यामुळे आव्हाड तुम्ही देखील आता बॅग भरायला लागा,अशा शब्दात सोमय्या यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावरही निशाणा साधला.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com