अनिल परबांनी आता कपड्याची बॅग भरून ठेवावी; ईडीच्या छापेमारीनंतर सोमय्यांचा इशारा

Anil Parab, Kirit Somaiya
Anil Parab, Kirit SomaiyaSaam Tv
Published On

मुंबई: शिवसेना (Shivsena) नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या घरावर आज सकाळी ईडीने छापेमारी (Ed raid) केली. अनिल परब यांच्या संबंधित मुंबई, पुणे आणि दापोली ठिकाणी 7 जागांवर ईडीकडून छापे टाकण्यात आले आहे. माहितीनुसार, ईडीचे अधिकारी जेव्हा धाड टाकण्यासाठी गेले तेव्हा अनिल परब घरी नव्हते. दरम्यान, ईडीच्या या मोठ्या कारवाईवर भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनिल परबांनी आता बॅग भरून ठेवावी असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. (Ed raids on Maharashtra Latest News)

Anil Parab, Kirit Somaiya
मोठी बातमी! मंत्री अनिल परबांवर ईडीची धाड; ७ ठिकाणी छापेमारी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जाणारे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या संबंधित 7 ठिकाणी ईडीने कारवाई करताना छापेमारी केली आहे. अनिल परब यांच्या मालमत्तांवर ईडीचे छापे हे दापोली रिसॉर्ट आणि इतर ठिकाणी ही छापेमारी सुरु केली आहे. विशेष बाब म्हणजे याआधी अनिल परब यांच्या सीएच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली होती. अनेक ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली होती. अनिल परब यांचे सीए आता आयकरच्या रडारवर होते. आता ईडीकडून झाडाझडती सुरु झाली आहे.

दरम्यान, अनिल परब यांच्याविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ईडीकडे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर आता ही छापेमारी सुरू असल्याची माहिती आहे. ईडीने परबांच्या घरावर छापा टाकल्याचं वृत्त समोर येताच किरीट सोमय्या एक सूचक ट्विट केलं आहे. अनिल परब यांच्यावर ईडीची कारवाई सुरू, अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर आता अनिल परब यांनी कपड्याची बॅग तयार ठेवावी असं किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com