
सचिन कदम
Raigad Crime News : रायगड जिल्ह्यातील खोपोली पोलिसांनी आज मोठी कारवाई केली आहे. त्यांनी एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकीतून हत्यार आणि गुटख्याच्या वाहतुकीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी आज, रविवारी सकाळी ताकई गावादरम्यान ही कारवाई केली आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित चारचाकीबाबत नागरीकांनी तक्रार दिली होती. त्यामुळे गस्त पथकाने सदर संशयित चारचाकीचा पाठलाग करून ताकई गाव हद्दीमध्ये हे चारचाकी वाहन पकडले. त्या वाहनातून सुमारे ७३ हजार रुपये किंमतीचा गुटखा, एक नकली बंदूक आणि तीन तलवारी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जमील खान (वय वर्ष 30) असे चालकाचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील आहे. मतदान प्रक्रियेच्या कामकाजावर प्रभाव पाडण्यासाठी व मतदार प्रक्रिया बाधित करण्यासाठी तलवारी, नकली बंदूकीचा वापर होणार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणी खोपोली पोलीस (Police) ठाण्यात भारतीय दंड सहितेच्या ३२८, २७२, २७३, १८८ सह गुटखा बंदी कायदा आणि भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युपी-बिहारमध्ये ज्या प्रमाणे स्टेजवर महिला नाचवल्या जातात. त्या प्रमाणे रायगड जिल्ह्यात काल, शनिवारी डीजेवर अश्लील गाणी लावून महिला नाचवण्याचा क्रार्यक्रम झाला. अजय सहानी या परप्रांतीय युवकाने पेण येथील आंबेगाव हद्दीतील आपल्या घरासमोर या युपी-बिहारच्या प्रकारचा नाचगाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
डीजेच्या तालावर महिला अश्लील हावभाव करून नाचवल्या जात असल्याचे समजताच स्थानिक शिवभक्तांनी कार्यक्रमाच्या स्थळी जाऊन हा नाच गाण्याचा कार्यक्रम उधळून लावला. महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचे आव्हान करीत यापुढे अशी थेरं येथे चालू देणार नाही, अशी तंबी स्थानिकांनी आयोजकांना दिली
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.