Ratnagiri Crime News: ६ लाख ५० हजारांच्या खंडणीप्रकरणी भूमि अभिलेख कार्यालयातील महिला कर्मचा-यासह एकावर गुन्हा दाखल

या प्रकरणाचां पाेलिस कसून तपास करीत आहेत.
Ratnagiri News, Khed Police Station
Ratnagiri News, Khed Police Stationsaam tv
Published On

- जितेश कोळी

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड (ratnagiri khed) येथील तालुका भूमि अभिलेख कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांनी जमिनीचे काम करून देण्यासाठी एका नागरिकाकडून ६ लाख ५० हजार रूपये उकळले. याप्रकरणी संबंधित नागरिकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी (khed police) दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. (Breaking Marathi News)

Ratnagiri News, Khed Police Station
Maharashtra Gram Panchayat By Election: कडक उन्हाळ्यात गावगाड्याचे राजकारण तापणार; थेट सरपंच पाेटनिवडणुकीची तारीख जाहीर

खेड तालुक्यातील वेताळवाडी येथील एक नागरिक जमिनीच्या कामासाठी तालुका भूमि अभिलेख कार्यालयात जुलै २०२१ मध्ये गेला होता. आपले काम पूर्ण करून देण्यासाठी भुमि अभिलेख कार्यालयातील दाेन कर्मचा-यांनी जुलै २०२१ ते जानेवारी २०२३ या कालावधीत नागरिकास ६ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली.

Ratnagiri News, Khed Police Station
'Narayan Rane भुंकण्याचा काम करताे, शिव्या घालण्याशिवाय बाकी काही काम नाही'

ही रक्कम न दिल्यास तुमच्या जमिनीच्या कामावर परिणाम होईल, काम होणार नाही अशी धमकी दिल्याचे फिर्यादीने पाेलिसांत दिलेल्या तकारीत नमूद केले आहे. काम होण्यासाठी या दोन कर्मचायांनी खेड उपअधीक्षक कार्यालय तसेच नागरिकाच्या वेताळवाडी येथे घरी कधी स्वतः पैसे घेतले.

Ratnagiri News, Khed Police Station
Gautami Patil Dance : सबसे कातील गौतमी पाटीलला धक्का; असं काय घडलं की मागावी लागली माफी, जाणून घ्या कारण

काही वेळेला संशयितांच्या हस्तकाद्वार रोख तसेच ऑनलाईन स्वरूपात ६ लाख ५० हजार रुपये स्वीकारल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीनुसार पाेलिसांनी शिवानंद टोपे आणि सायली धोत्रे या भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचा-यांवर (भा.द.वी 384 व 34 कलमान्वये) गुन्हा दाखल केले आहे. पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com