तळीयेप्रमाणे आमचेही पुनर्वसन करा; केवनाळे दरड बाधितांची शासनाकडे मागणी

आमचेही पुनर्वसन तळीयेप्रमाणे (Taliye Landslide) करावे. दरडीखाली आमचा पूर्ण संसार गाडला गेला.
तळीयेप्रमाणे आमचेही पुनर्वसन करा; केवनाळे दरड बाधितांची शासनाकडे मागणी
तळीयेप्रमाणे आमचेही पुनर्वसन करा; केवनाळे दरड बाधितांची शासनाकडे मागणीSaam Tv
Published On

राजेश भोस्तेकर

रायगड: आमचेही पुनर्वसन तळीयेप्रमाणे (Taliye Landslide) करावे. दरडीखाली आमचा पूर्ण संसार गाडला गेला. आम्ही उघड्यावर आलो आहोत. आमची माणसे दरडीखाली गाढली गेली. नातेवाईकांकडे आम्ही सध्या राहत आहोत. त्यामुळे आमचेही पुनर्वसन लवकरात लवकर करा अशी कळकळीची विनंती केवनाळे गावातील दरड बाधित दाभेकर कुटूंबाने शासन आणि प्रशासनाकडे केली आहे. केवनाळे आणि साखर सुतारवाडी दरडग्रस्त बाधित कुटूंबाचे जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांमार्फत पुनर्वसन केले जाणार असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.

22 जुलै रोजी महाड तालुक्यातील तळीये गावात कोंडाळकर वाडीवर दरड कोसळून 84 जण गाढले गेले. त्याचवेळी पोलादपूर तालुक्यात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास केवनाळे आणि साखर सुतारवाडी येथे दरड कोसळून 11 जणांचा दरडीखाली मृत्यू झाला. या दुर्घटनेत केवनाळे येथील दाभेकर कुटूंबातील गेनू दाभेकर, (72) इंद्राबाई दाभेकर (62), सुनील केशव दाभेकर (32), शिल्पा सुनील दाभेकर (28), यांच्यासह महादेव कदम (70) असे पाच जणांचा मृत्यू झाला.

तळीयेप्रमाणे आमचेही पुनर्वसन करा; केवनाळे दरड बाधितांची शासनाकडे मागणी
RT-PCR ला सेनेचा विराेध; पुणे बंगळरु महामार्ग राेखला

दरड दुर्घटनेत माझे सासू सासरे, दीर, भावजय हे दरडीखाली गाढले गेले. ही घटना आम्हाला सकाळी कळल्यानंतर मुंबई येथून आलो. पूर्ण घर उध्वस्त झाले, घरातील माणसे गेली. घर नसल्याने नातेवाईकांकडे राहावे लागत आहे. त्यामुळे शासनाने आमचे पण लवकरात लवकर पुनर्वसन करा.

केवनाळे गावावर दरड संकट कोसळले आहे. सध्या आम्ही भयभीत झालो आहोत. अजूनही दरड कोसळण्याची भीती आहे. आम्हाला त्याठिकाणी राहायचे नाही. त्यामुळे तळीये गावप्रमाणे आमचेही सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करा ही शासनाकडे कळकळीची मागणी करीत आहे.

केवनाळे आणि साखर सुतारवाडी येथील बाधित कुटूंबाचे पुनर्वसन हे जिल्हा पुनर्वसन मार्फत केले जाणार आहे. तसा प्रस्ताव प्रांताधिकारी, तहसीलदात याच्या मार्फ़त तयार केला जात आहे. गावात शासकीय जागा उपलब्ध नसल्याने खाजगी जागेचा शोध घेतला जात आहे. बाधित ज्याठिकाणी जागा दाखवतील त्या सुरक्षित ठिकाणी त्यांना घरे बांधून दिली जाणार आहेत. त्यामुळे केवनाळे आणि साखर सुतारवाडी बाधित कुटूंबाच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाने पावले उचलली गेली आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com