RT-PCR ला सेनेचा विराेध; पुणे बंगळरु महामार्ग राेखला

shivsena
shivsena
Published On

काेल्हापूर : पुणे बंगळूर महामार्गावरुन काेल्हापूर kolhapur जिल्ह्यातील काही तालुक्यांत जाताना ग्रामस्थांना कर्नाटक सरकारच्या आडमुठे धाेरणाचा फटका बसत आहे. या गावांमध्ये जाताना कर्नाटक सरकारने काेविड १९ ची आरटीपीसीआर RT-PCR तपासणी बंधनकारक केली आहे. आमच्या महाराष्ट्रातील आमच्या गावांत जाण्यासाठी यांची का परवानगी घ्यायची हा मुद्दा उचलून आज (गुरवार) काेल्हापूरातील शिवसैनिक shivsena काेगनाळी नाक्यावर घुसले आहेत.

दरम्यान कर्नाटक पाेलिसांनी karnatak police वरिष्ठ प्रशासकीय अधिका-यांपर्यंत आपली मागणी आम्ही सादर करु. जिल्हा प्रशासन एकमेकांशी संवाद साधून तुमच्या मागणीवर विचार करतील असे नमूद केले. त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी घाेषणाबाजी करुन कर्नाटकमधून येणारी वाहने अडवली. जाेपर्यंत मागणी मान्य हाेत नाही ताेपर्यंत आम्ही हटणार नाही असा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला आहे.

शिवसेनेचे काेल्हापूरचे जिल्हा प्रमुख म्हणाले विजय देवणे म्हणाले काेविडच्या पार्श्वभुमीवर गडहिंगलज, कागल, आजरा, चंदगड या चार तालुक्यांत जाता नागरिकांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. महाराष्ट्रातून महाराष्ट्रात जाण्याचा आमचा अधिकार आहे. ताे अधिकार त्यांना घेता येणार नाही. आम्ही भगव्या रॅलीच्या माध्यमातून कर्नाटक सरकारला जागे करुन महाराष्ट्रातील जनतेवरील अन्याय दूरा अशी मागणी करीत आहाेत.

आधार कार्ड पहा आणि मग महाराष्ट्रातील वाहनांना साेडा अशी आमची मागणी आहे. आमची मागणी न झाल्यास आम्ही टाेल नाका उद्धवस्त करणार असा इशारा ही देण्यात आला आहे.

shivsena
ठाकरे सरकार! आता आमच्या मरणाची वाट पाहू नका? जागे व्हा!

जिल्हा प्रमुख संजय पवार म्हणाले शिवसैनिक म्हणाले जिथं जिथं संधी मिळते तिथं तिथं महाराष्ट्रावर येथील नागरिकांना कर्नाटक सरकार अन्याय करते हा पुर्वानुभव आहे. त्यांच्या मनात पाप असल्याने ते असे कृत्य करीत आहे. आम्ही गप्प बसणार नाही. अन्याय सहन करणार नाही. तुम्ही आमच्या लाेकांना साेडत नाही ना मग आम्ही त्यांना जशास तसे उत्तर देऊ. आम्ही त्यांचे आधारकार्ड बघू, वाहन परवाना बघू मगच प्रवेश देऊ असे नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com