K ChandrasheKhar Rao: अब की बार किसान सरकार! KCR यांची महाराष्ट्रात एन्ट्री, मोदी सरकारवर केला हल्लाबोल

आज केसीआर यांनी नांदेडमध्ये जाहीर सभा घेतली या सभेला मोठ्या संख्येने लोकांनी पाठिंबा दर्शवला.
K Chandrashekhar Rao In Nanded
K Chandrashekhar Rao In NandedSaamtv
Published On

Nanded: तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांची महाराष्ट्रात मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर आज अहेरी येथील माजी आमदार दीपक आत्राम यांनी केसीआर यांच्या उपस्थितीत भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात प्रवेश केला आहे.

यावेळी झालेल्या सभेत बोलताना केसीआर यांनी शेतकरी आत्महत्या आणि पाण्याचे नियोजनावरून राज्यासह केंद्र सरकार टीका केली. (Latest Marathi News)

K Chandrashekhar Rao In Nanded
Chinese App ban: मोदी सरकारचा चीनवर डिजिटल स्ट्राईक; 200 हून अधिक चिनी अॅप्सवर घातली बंदी

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या पक्षाने महाराष्ट्रात एंट्री केली आहे. तेलंगानाच्या लगत असलेला आणि काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या नांदेडमध्ये पक्ष वाढीचा शुभारंभ केला आहे. आज केसीआर यांनी नांदेडमध्ये जाहीर सभा घेतली या सभेला मोठ्या संख्येने लोकांनी पाठिंबा दर्शवला.

अबकी बार किसान सरकारचा दिला नारा...

"महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. याचं कारण काय? जेव्हा सर्व रस्ते बंद असतात, तेव्हाच माणूस आत्महत्या करतो. देशाला अन्न देणारा अन्नदाता आज आत्महत्या करण्यासाठी मजबूर झाला आहे. एकीकडे शेतकरी आत्महत्या करत आहे, तर राजकीय नेते विधानसभेत आणि संसदेत भाषण देण्यात व्यस्त आहेत, असे म्हणत अबकी बार किसान सरकार’," अशा नारा त्यांनी दिला.

K Chandrashekhar Rao In Nanded
Pune News: पुण्यात उद्या मविआ आणि भाजपचे उमेदवार आमने-सामने येणार! नेमकं कशासाठी?

काय म्हणाले केसीआर..

केसीआर यांनी आपल्या भाषणातून केंद्र तसेच राज्य सरकारवर जोरदार टीका केली. "देशात आज परिवर्तनाची आवश्यता आहे. देशाला स्वातंत्र्य होऊन ७५ वर्ष झाली. याकाळात देशात अनेक सरकारे बदलली. अनेक नेते, आमदार खासदार बदलले. अनेकांनी मोठी आश्वासने दिली. मात्र, आज देशात पिण्यासाठी पाणी नाही, शेतकऱ्यांकडे सिंचनासाठी पाणी नाही"

"गरिबांना आज वीजदेखील मिळत नाही. त्यामुळे या गोष्टी आपण समजून घेऊन एकत्र लढा दिला पाहिजे," असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले. (Nanded News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com