आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी केली आहे. या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष करुणा शर्मा यांनी मोठी घोषणा केली. तसेच बीडमधून लोकसभा लढवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. (Latest Marathi News)
स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष करुणा शर्मा या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान करुणा शर्मा यांनी आज शनिवारी छत्रपती संभाजीनगर शहरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी करुणा शर्मा यांनी स्वराज्य शक्ती सेना आगामी लोकसभेच्या निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. करुणा शर्मा यांच्या स्वराज्य शक्ती सेनेने आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
करुणा शर्मा या पत्रकार परिषदेत म्हणाल्या, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. त्याला हे सरकार जबाबदार आहे. राज्य सरकारने महाराष्ट्राचे बिहार केला, असा घणाघाती आरोपही त्यांनी सत्ताधारी पक्षावर केला.
'विधानसभा निवडणुकीत सर्व 288 जागा लढवणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितलं. तसचे यावेळी स्वतः करुणा शर्मा या बीडमधून लोकसभा लढणार असल्याची ही माहिती यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
धाराशिवमध्ये माध्यमांशी संवाद साधताना करुणा शर्मा म्हणाल्या, 'सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भ्रष्टाचारी पक्ष एकत्र आल्याचे दिसून येत आहे. ते एकत्र येऊन जनतेवर मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार करीत आहेत. यामुळे मी स्वराज्य शक्ती सेना पक्ष काढलेला आहे. या पक्षाची मी नोंदणी केली आहे. मला पक्षाचे नाव मिळाले आहे. लवकरच चिन्हही मिळेल. लोकशाही वाचवायची असेल तर खासगीकरण थांबवावे लागेल'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.