Karjat : कौतुकास्पद! तरुणामुळे वाचले धावत्या ट्रेनमध्ये चढणाऱ्या वृद्धाचे प्राण; CCTV मध्ये थरार कैद

कर्जत रेल्वे स्थानकावर तरुणाने प्रसंगवधान राखत एका वृद्धाचे प्राण वाचवले आहे
karjat news
karjat news saam tv
Published On

सचिन कदम

रायगड : धावत्या रेल्वेतून उतरताना आणि चढण्याच्या प्रयत्नात अपघात झाल्याची अनेक प्रकरणे मुंबईसह देशातील अनेक रेल्वे स्थानकावर घडतात. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तर रोज असे अपघात पाहायला मिळतात. तरीही प्रवास करणाऱ्यांकडून अशा घोडचुका होत असतात. तरीदेखील प्रवाशांकडून धावत्या रेल्वेत चढताना किंवा उतरतान्याचे जीवघेणे खेळ सुरू असतात. कर्जत रेल्वे स्थानकावर असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. कर्जत रेल्वे स्थानकावर तरुणाने प्रसंगवधान राखत एका वृद्धाचे प्राण वाचवले आहे. (Karjat News In Marathi )

karjat news
दुर्देवी घटना! चालकाचं नियंत्रण सुटलं अन् प्रवाशांनी भरलेली बस थेट दरीत कोसळली!

रेल्वे स्थानकावर असलेल्या सीसीटिव्ही फुटेजमधून ही घटना समोर आली आहे. कर्जत स्थानकावर एका वृद्धाने धावती लोकल (Local) ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या वृद्धाचा तोल गेला.त्यामुळे ते फलाटवर पडले. एक हाताने त्यांनी रेल्वेचे दार पकडल्याने सदर वृद्ध फरपटले जात होते. मात्र, सुदैवाने ते रेल्वेच्या खाली गेले नाही. ते वृद्ध फलाटावर पडले, त्यावेळी केतन थोरवे नामक या तरुणाने प्रसंगवधान राखत त्यांना तातडीने मागे खेचले. त्यामुळे ते वृद्ध मोठ्या रेल्वे अपघातातून थोडक्यात बचावले. तसेच या वृद्धाला वाचवणाऱ्या तरुणाने पुन्हा तीच धावती लोकल ट्रेन पकडली.

karjat news
Rakhi Sawant : राखी सावंतला मुंबई पोलिसांचा दणका! ट्रॅफिक जाम करणे पडले महागात

दरम्यान, कर्जत रेल्वे स्थानकावरील तरुणाकडून वृद्धाला वाचवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. केतन थोरवे असे प्रसंगावधान राखत वृध्दाचे प्राण वाचवणाऱ्या तरुणाचे नाव आहे. सदर तरुण कर्जतमधील (Karjat) पोसरी येथे राहतो. या व्हायरल व्हिडीओनंतर तरुणाच्या शौर्याचे कौतुक होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com