Rohit Pawar Protest: मंत्री उदय सामंतांचा एक शब्द अन् रोहित पवारांकडून आंदोलन मागे; तरुणांच्या नोकरीचा प्रश्न सुटणार?

Rohit Pawar Protest: सांगितल्याप्रमाणे झालं नाही तर, माझ्यासह माझ्या मतदारसंघातील अनेक आमदार मुंबईत येऊन आमरण उपोषण करतील, असा इशारा रोहित पवारांनी उदय सामंत यांना दिला आहे.
Rohit pawar
Rohit pawar saam tv

Maharashtra Political News: आज सकाळपासूनच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार विधान भवनाबाहेर आंदोलन करत होते. जामखेड एमआयडीसी प्रकरणी सुरू असलेलं हे आंदोलन रोहित पवारांनी आता मागे घेतलं आहे. (Latest Marathi News)

रोहित पवारांनी आंदोलन मागे घेताना म्हटलं की, "पूर्वी काय झालं याच्यात न जाता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी बसून मी आंदोलन केलं. यावेळी उदय सामंत यांनी येऊन बैठक घेण्याचा शब्द दिला आणि अधिवेशन संपण्याअगोदर अधिसूचना काढणार असं देखील ते म्हणाले."

Rohit pawar
Sangli Crime News : घरात घुसून सराईत गुन्हेगाराला मारले; अज्ञात तरुणांकडून पहाटेच हल्ला

रोजगाराच्या अडचणी सुटाव्या म्हणून आज मी आंदोलन केलं. वर्षभरात अनेकवेळा उदय सामंत, CM, DCM यांना भेटून अधिसूचना काढावी यासाठी विनंती करत होतो, असंही रोहित पवारांनी यावेळी सांगितलं.

...तर आमरण उपोषण करू

"महाराष्ट्राचे मंत्री म्हणून विश्वास ठेवणं ही आमची जबाबदारी आहे. मी माझं आंदोलन मागे घेतोय. पण जर त्यांनी सांगितल्याप्रमाणे झालं नाही तर, माझ्यासह माझ्या मतदारसंघातील अनेक आमदार मुंबईत येऊन आमरण उपोषण करतील, असा इशारा रोहित पवारांनी उदय सामंत यांना दिला आहे.

Rohit pawar
Nanded Crime News: खळबळजनक! पार्किंगच्या वादातून तरुणाचा हात छाटला; पोलिसांनी शहरातून धिंड काढत उतरवली मस्ती

काय म्हणाले उदय सामंत?

रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एमआयडीसीसाठी आंदोलन सुरू केलं होतं. उद्योगमंत्री म्हणून मी भेट घेतली. उद्याच्या उद्या या एमआयडीसीसाठी बैठक घेतली जाईल. अधिसूचना काढावी यासाठी उद्योग विभाग सकारात्मक आहे. त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला आहे, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com