करंबेळी, खडई ग्रामस्थांनी घातले रायगड जिल्हा परिषदेचे श्राद्ध...

चांगल्या रस्त्यासाठी रायगड जिल्हा परिषदेवर आदिवासींनी मोर्चा काढत, आमचा रस्ता शोधून द्या ही मागणी केली आहे.
करंबेळी, खडई ग्रामस्थांनी घातले रायगड जिल्हा परिषदेचे श्राद्ध...
करंबेळी, खडई ग्रामस्थांनी घातले रायगड जिल्हा परिषदेचे श्राद्ध...राजेश भोस्तेकर
Published On

राजेश भोस्तेकर, रायगड

रायगड: करंबेळी, खडई ग्रामस्थांनी रायगड जिल्हा परिषदेचे श्राद्ध घातले आहे. स्वातंत्र्यानंतरही येथील आदिवासींचा प्रवास खडतर आहे. त्यामुळे चांगल्या रस्त्यासाठी रायगड जिल्हा परिषदेवर आदिवासींनी मोर्चा काढत, आमचा रस्ता शोधून द्या ही मागणी केली आहे. (Karambeli, Khadai villagers agitation against Raigad Zilla Parishad)

हे देखील पहा -

महाड तालुक्यातील बावले गावाला रस्ता नसल्याने गावच्या सरपंचाला डोलीतून रुग्णालयात नेल्याची घटना ताजी असताना खालापूर तालुक्यातील खानाव व खरवली ग्रामपंचायत हद्दीतील करंबेळी आणि खडई या आदिवासी वाडीतील ग्रामस्थांनी रस्त्यासाठी आज सर्वपित्री अमावस्येच्या अनुषंगाने अलिबाग येथे रायगड जिल्हा परिषदेचे श्राद्ध घालून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांनी आज रायगड जिल्हा परिषदेवर अलिबाग आंबेडकर पुतळा येथून मोर्चा काढला.

रायगड जिल्हा परिषदेच्या आधी पोलिसांनी हा मोर्चा अडवला. त्यानंतर या मोर्चेकरांनी रस्त्यावरच श्राद्ध घालून काव-काव करीत जिल्हा परिषदेच्या निष्काळजी पणाचा निषेध व्यक्त केला. त्यामुळे जिल्हा परिषदेचे श्राद्ध घालण्याचा हा पहिलाच प्रकार आज मोर्चेकरांनी दाखविला. रस्त्यासाठी नागरिकांना मोर्चे आंदोलन करावी लागत आहे ही एक रायगडासाठी शोकांतिका आहे.

करंबेळी, खडई ग्रामस्थांनी घातले रायगड जिल्हा परिषदेचे श्राद्ध...
करंबेळी, खडई ग्रामस्थांनी घातले रायगड जिल्हा परिषदेचे श्राद्ध...राजेश भोस्तेकर

खालापूर तालुक्यातील खानाव व खरवली ग्रामपंचायत हद्दीत करंबेळी आणि खडई ह्या दोन आदिवासी वाड्या आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळवून आज 75 वर्ष झाले. मात्र आदिवासी समाज हा आजही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षपणामुळे मूलभूत सुविधांपासून वंचित राहिला आहे. करंबेळी आणि खडई या आदिवासी वाडीवर जाण्यासाठी अद्याप रस्ताच नाही. विशेष म्हणजे रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्याला जिल्हा ग्रामीण रस्ता 132 नावाने शासन दरबारी नोंद आहे. मात्र या गावात जाणारा रस्ताच गायब आहे. अनेक वेळा निवेदन, आंदोलन करूनही प्रशासनाकडून कोणतीही पावले रस्त्यासाठी उचलली नाही. अखेर आदिवासी बांधवांना मोर्चा काढून जिल्हा परिषदेचे श्राद्ध घालावे लागले.

करंबेळी, खडई ग्रामस्थांनी घातले रायगड जिल्हा परिषदेचे श्राद्ध...
मोठी बातमी! परमबीर सिंह चांदिवाल आयोगासमोर गैरहजर

सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो आदिवासी बांधव या मोर्च्यात सहभागी झाले होते. लहान बालकांसह महिला आणि पुरुष मंडळी सहभागी झाले होते. पोलिसांनी मोर्च्याला परवानगी नाकारली असली तरी मोर्चेकऱ्यांनी आपला मोर्चा काढला. यावेळी घोषणाबाजी करीत रायगड जिल्हा परिषदेचा निषेध व्यक्त केला. रायगड जिल्हा परिषद कार्यलयाच्या आधी पोलिसांनी मोर्चा अडवला. यावेळी आदिवासी बांधवांनी रायगड जिल्हा परिषदेच्या फोटोला हार घालून श्राद्ध केले. आमचा हरवलेला रस्ता शोधून द्या अशी मागणी या आंदोलन कर्त्यांनी केली आहे. रस्ता केला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा आंदोलन कर्त्यांनी दिला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com