मोठी बातमी! परमबीर सिंह चांदिवाल आयोगासमोर गैरहजर

संजीव पलांडे यांच्या वकिलांनी परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यास सांगितले आहे.
मोठी बातमी! परमबीर सिंह चांदिवाल आयोगासमोर गैरहजर
मोठी बातमी! परमबीर सिंह चांदिवाल आयोगासमोर गैरहजर - Saam Tv
Published On

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param bir Singh) आजही चांदिवाल आयोगासमोर गैरहजर राहिले आहेत. राज्य सीआयडीच्या एसपीने आपला अहवाल चांदीवाल आयोगाला दिला आणि सांगितले की ते प्रत्येक पत्त्यावर परमबिर सिंह यांना हजर राहण्या संदर्भात पत्रव्यवहार करण्यासाठी गेले होते. पर परमबीर कुठेही सापडले नाही. याशिवाय, आम्ही अल्केमिस्ट हॉस्पिटलमध्ये जाऊनही पडताळणी केली, परंतु त्यांच्याबद्दल काहीही सापडले नाही. सीआयडीने काही पोलिसांचे जबाबही नोंदवले पण काहीही सापडले नाही. परमबीर सिंग यांना सीआयडी जामीनपात्र वॉरंट देऊ शकले नाही. संजीव पलांडे यांच्या वकिलांनी परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यास सांगितले आहे. अनिल देशमुख यांच्या अनिता शेखर यांनी परमबीर सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यास सांगितले आहे, त्यासोबत मालमत्ता जप्त करण्याची मागणीही केली आहे.

मोठी बातमी! परमबीर सिंह चांदिवाल आयोगासमोर गैरहजर
Akola: जिल्हा परिषदेच्या 6 गटात वंचितची बाजी; प्रहारने उघडले खाते

दरम्यान अँटिलिया प्रकरण (Antilia) आणि मनसुख हिरेन हत्या (Mansukh Hiren Murder Case) प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एनआयएने (NIA) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना (Parambir Singh) अनेक वेळा चौकशीसाठी बोलावले, परंतु त्यांच्यापर्यंत एकही समन्स पोहचले नाही. एनआयए आणि महाराष्ट्र राज्य तपास यंत्रणांना संशय आहे की, अटकेच्या भीतीने परमबीर सिंग यांनी देश सोडला संशय तपास यंत्रणांना आहे. त्यात आजही परमबीर सिंग कोर्टासमोर हजर न राहिल्याने हा संशय बलावला आहे.

एनआयएच्या सूत्रांनी सांगितले होते की, सचिन वाजेच्या अटकेनंतर सुरू असलेल्या तपासादरम्यान, परमबीर सिंह यांना एप्रिल महिन्यात एनआयए कार्यालयात बोलावले होते. या चौकशीला परमबिर सिंह हे मलबार हिल येथील एनआयए कार्यालयात हजर देखील राहिले होते. त्यावेळी एनआयएने सचिन वाजे याच्याशी संबंधित अनेक प्रश्न परमबीर सिंह यांना विचारले, अँटिलियाची घटना उघडकीस आली तेव्हा वाजेकडेच का? या प्रकरणाचा तपास का सोपवला. तसेच वाजे थेट परमबीर सिंग यांनाच का रिपोर्ट करायचा. या सारखे प्रश्न विचारण्यात आले होते.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com