पडले, खरचटले... जिद्द हरले नाहीत; डाेंगरातच गुंडास गाठले अन्...

karad
karad
Published On

कराड : अनेक गुन्ह्यात आरोपी असलेला तडीपार गुंड अभिनंदन झेंडे याला कराड karad तालुका पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सापळा लावून अटक केली. आरोपी सशस्त्र असतानाही पोलिसांनी हे धाडस केले. डोंगरात पाठलाग करताना पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर आणि त्यांचे सहकारी किरकोळ जखमी झाले.

कराड शहरातील गुंड अभिनंदन झेंडे याला तडीपार करण्यात आल्याने त्याला सातारा जिल्हा हद्दीत प्रवेश करण्यास परवानगी नाही. तरी तो जुळेवाडी येथे येऊन ग्रामस्थांवर दहशत माजवत होता. यातूनच वाद झाल्यानंतर झेंडे याने त्याच्या टोळीतील आणखी काही जणांना बोलवून स्थानिक तरुणांना बेदम मारहाण केली.

याची माहिती कराड तालुका पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलिस अधीक्षक रणजित पाटील, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अशोक भापकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी झेंडे कुठे आहे याची माहिती घेऊन सापळा रचला.

karad
साता-यातून पळून गेलेले ते दाेघे अडकले पाेलिसांच्या जाळ्यात

किल्ले मच्छिंद्रगड येथील जगंलात त्याचा पाठलाग सुरू केला. यावेळी पाठलाग करताना पोलिसांना शरीरावरील अनेक ठिकाणी खरचटले तरीही त्यांनी झेंडेचा माग काढत त्याला पकडले. यावेळी झेंडेने जोरदार प्रतिकार केला. मात्र पाेलिसी बळापुढं त्याचे काही चालले नाही. या कामगिरीमुळे कराड तालुका पोलिसांचे कौतुक होत आहे. या मोहिमेत सहायक फौजदार एक्के, पोलिस नाईक काळे, पोलिस शिपाई काळे सहभागी झाले हाेते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com