
Political News : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना मानहानीच्या प्रकरणात सुरत न्यायालयाने दोषी ठरवले आहे. यात त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली असून त्यांचा जामीन देखील मंजूर झाला आहे. अशात सध्या राजकारणात राहुल गांधी यांचा मुद्दा मोठा चर्चेत आला आहे. सुरत न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर आता राहुल गांधी यांच्या खासदारकीच्या पदावर प्रश्न उपस्थित होत आहेत. अशात या सर्वांवर जेष्ठ वकिल कपिल सिब्बल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Kapil Sibal)
राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याने ते खासदार म्हणून अपात्र ठरत आहेत, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांच्यावर दाखल झालेल्या शिक्षेनंतर आपोआप त्यांना खासदार म्हणून अपात्र टरवले जाते. त्यांना दिलेली ही शिक्षा थोडी विचित्र आहे. ते संसद सदस्य म्हणून आता कायदेशीररित्या अपात्र झालेत, असं सिब्बल यांनी म्हटलं आहे.
दोषसिद्धीला स्थगिती मिळणे आवश्यक आहे. दोषसिद्धीला स्थगिती दिल्यानंतरच राहुल गांधी संसदेचे सदस्य म्हणून राहू शकतील. कायद्याच्या एखाद्या गुन्ह्यात २ वर्षांची शिक्षा सुनावली तर त्यांची लोकसभेची जागा रिक्त राहेत, असं कपिल सिब्बल यांच म्हणणं आहे.
नेमक प्रकरण काय आहे?
13 एप्रिल 2019 रोजी कर्नाटकातील कोलार येथे एका निवडणूक सभेत राहुल गांधींनी "नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी हे आडनाव सामान्य का आहे? सगळ्या चोरांची आडनाव मोदी का?" असे विधान केले होते. याच प्रकरणावरुन राहुल गांधी यांच्यावर गेल्या चार वर्षांपासून मानहानीचा खटला सुरू होता.
त्यावर काल सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांचा तुरुंगवास तसेच 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मात्र,नंतर न्यायालयाने राहुल गांधींना तात्काळ जामीन देखील मंजूर केला. तसेच उच्च न्यायालयात जाण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.