Kalyan News : दहीहंडी व गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे भरून दुरुस्ती करा; केडीएमसी आयुक्तांकडे मागणी

Kalyan News : आगामी दिवसात येत असलेले दहीहंडी, गणेशोत्सव या सार्वजनिक सणांच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर खड्डे भरण्यात यावे अशी मागणी
Kalyan News
Kalyan NewsSaam tv
Published On

अभिजित देशमुख 

कल्याण : कल्याण शहरातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत असतो. यामुळे आगामी दहीहंडी व गणपती उत्सवापूर्वी कल्याण पूर्व भागातील रस्त्यांवरील खड्डे बुजवत रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी; अशी मागणी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी व भाजपा कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख सुलभा गायकवाड यांनी महापालिका आयुक्तांकडे केली.

Kalyan News
Pune Bhatghar Dam : ब्रिटिशकालीन भाटघर धरण ओव्हर फ्लो; नीरा देवघर धरणाच्या सांडव्यातूनही विसर्ग Video

कल्याण (Kalyan) पूर्व भागातील श्रीमलंग रोड, चिंचपाडा, पूनालिंक रोड आदि रस्त्यांवरील खड्डे, दूषित पाणी पुरवठा, पाणी टंचाई, कचरा समस्याबाबत आज सुलभा गायकवाड यांनी महापालिका (KDMC) आयुक्त इंदू राणी जाखड यांची भेट घेतली. प्रामुख्याने आगामी दिवसात येत असलेले दहीहंडी, गणेशोत्सव या सार्वजनिक सणांच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर खड्डे भरण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सुलभा गायकवाड यांनी सांगितले. 

Kalyan News
Nandurbar News : तहसीलदारांच्या मनमानी कारभारामुळे ठाकरे गट आक्रमक; नंदुरबारमध्ये बेमुदत उपोषण

कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघावर शिवसेना शिंदे गट व भाजपा दोघांनी दावा केल्याने महायुतीत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपाने हा मतदार संघ आपल्याकडे राहावा यासाठी दंड थोपटले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपकडून आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना विधानसभा प्रमुख पदि नियुक्ग केलं आहे. त्यानंतर सुलभा गायकवाड या भाजपच्या बैठकांमध्ये दिसून येत होत्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुलभा गायकवाड राजकारणात ऍक्टिव्ह झाल्याचे पाहायला मिळतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com