KDMC News : केडीएमसी मुख्यालयाच्या हाकेच्या अंतरावरील परिसरात खड्डे, चिखल; नागरिक त्रस्त, महापालिकेचे दुर्लक्ष

Kalyan News केडीएमसी मुख्यालयाच्या हाकेच्या अंतरावरील परिसरात खड्डे, चिखल; नागरिक त्रस्त, महापालिकेचे दुर्लक्ष
KDMC News
KDMC NewsSaam tv
Published On

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याण- डोंबिवली महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बैलबाजार, गोविंदवाडी, गफूरडोन चौक, घासबाजार, मौलवी कंपाउंड परिसरात रखडलेले रस्ते, खड्ड्यामुळे (Kalyan) रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य... फुटलेली गटारे जागोजागी कचाऱ्याचे ढीग..यामुळे नागरिक त्रस्त झालेत. (KDMC) या रस्त्यावर वाहने सोडाच पण चालणे देखील कठीण होऊन बसले आहे. नागरिकांना भेडसावणारा या समस्यांकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचा देखील दुर्लक्ष असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. (Breaking Marathi News)

KDMC News
Jalgaon Crime News: जळगाव हादरलं! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, खून करून मृतदेह कडबा कुट्टीत लपवला; नराधम ताब्यात

कल्याण- डोंबिवली महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मुस्लीम बहुल बैल बाजार परिसरात मुलभूत सुविधाचा बोजवारा उडालेला दिसून येत आहे. बैल बाजार, गोविंदवाडी, गफूरडोन चौक, घासबाजार, मौलवी कपाउंड (Dombivili) परिसरातील प्रत्येक रस्त्याची यंदाच्या पावसाळ्यात अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने आता रस्त्यांवर चिखल पसरलाय. रस्त्याचे दुतर्फा असलेल्या गटाराचे पाणी रस्त्यांवरून वाहतय. जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याने या परिसरात दुर्गंधी व अस्वच्छता पसरली आहे. 

KDMC News
Ganesh Festival 2023 : बाप्पा यंदाही महागणार; कच्च्या मालाच्या किंमती वाढल्याचा फटका

परिसरातील मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम एमएमआरडीएम मार्फत हाती घेण्यात आले. मात्र हे काम देखील अत्यंत संथगतीने सुरू असल्याने याचा फटका आता नागरिकांना बसतोय. या भागात तीन शाळा, एक कॉलेज असून विद्यार्थ्यांना देखील या खड्ड्यांचा नाहक त्रास सहन करावा लागतो. या समस्यांकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही. मात्र स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी करून  महापालिका लक्ष देत नाही. लोकप्रतिनिधी काही करीत नाहीत. लवकरात लवकर महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यांवे. महापालिकेने जर या समस्याबाबत तत्काळ उपयोजना केले नाही. तर महापालिका मुख्यालयावर हजारोंच्या संख्येने मोर्चा काढू असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिलाय. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com