KDMC News : कल्याणमधील कचोरे टेकडीवरील कुटुंबाचे स्थलातरण; इर्शाळवाडीतील दुर्घटनेनंतर केडीएमसी सतर्क

Kalyan News कल्याणमधील कचोरे टेकडीवरील कुटुंबाचे स्थलातरण; इर्शाळवाडीतील दुर्घटनेनंतर केडीएमसी सतर्क
KDMC News
KDMC NewsSaam tv
Published On

अभिजित देशमुख
कल्याण
: कल्याणमधील नेतीवली कचोरे टेकडीवर राहणाऱ्या १४० कुटुंबाना जून महिन्यात पालिकेने स्थलांतर (Kalyan) करण्याबाबत नोटीसा पाठवल्या होत्या. मात्र रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी दरड कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेने (KDMC) सतर्कता दाखवत येथील कुटुंबांना स्थलांतरित करत आहेत.  (Maharashtra News)

KDMC News
land Sliding : कोल्हापूर जिल्ह्यातील ८८ गावांना भुस्खलनाचा धोका; गावांची होणार दिवसातून दोनदा पाहणी

कल्याण शहरातील नेतीवली आणि कचोरे टेकडीवरील दरड कोसळन्याच्या घटना दरवर्षी पावसाळ्यात घडतात. या दुर्घटनेत नागरिक जखमी होत असले, तरी दरवर्षी या टेकडीवरील झोपड्याची संख्या वाढतच आहे. या टेकडीवर दुर्घटना घडण्याची भीती यंदाही व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने पावसाळ्यात जून महिन्यात नेतिवली कचोरी टेकडीवरील १४० रहिवाशांना स्थलांतर करण्याच्या नोटिसा पाठवल्या होत्या. ईर्षाळवाडी दरड दुर्घटनेनंतर कल्याण डोंबवली महापालिकेने ठोस पावलं उचलली आहेत.

KDMC News
Sambhajinagar News : शेतकऱ्यांना प्रत्येक हंगामात एकरी १० हजार द्यावे; खुद्द विभागीय आयुक्तांचीच मागणी

२० कुटुंब स्थलांतरित   

रायगड जिल्ह्यातील इर्शालवाळीत दरळ कोसळल्यानंतर कल्याण डोंबिवलीतील दरड प्रवण क्षेत्राची पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी पाहणी केली. यावेळी कचोरे टेकडीवरील अपघात प्रवण भागातील नोटीस दिलेल्या काही नागरिकांनी स्थलांतर केले असून उर्वरीत नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना केल्या. यामधील २० कुटुंबाचे स्थलांतरण करण्यात आल्याचे सहाय्यक आयुक्त अधिकारी सविता हिले यांनी सांगितले. या कुटुंबाचे याच परिसरात असलेल्या संक्रमण शिबिरांमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. त्याची राहण्याची जेवण्याची सोय महापालिकेतर्फे करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com