Kalyan News : संरक्षक भिंतीवरून वाद विकोपाला; भिंत पडून रस्ता केल्याचा आरोप, रहिवाशांचा पोलीसांना घेराव

Kalyan News : सोसायटीच्या आवारात शेकडो रहिवासी जमले आणि त्यांनी रस्ता बंद करणार असल्याचा बोर्ड लावला. सहजीवन रेसिडेन्सीमध्ये रहिवासी आणि गोपाळनगर रहिवासी,बंगला मालक गायकवाड कुटुंबियांमध्ये जोरदार वाद झाला
Kalyan News
Kalyan NewsSaam tv
Published On

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याण पूर्व येथील तिसगाव नाका परिसरात असलेल्या एका सोसायटी आणि बंगला मालकाचा वाद विकोपाला गेल्याचे पाहायला मिळालं. (Kalyan) सोसायटीमधील रहिवाशांनी बंगला मालकाने संरक्षक भिंत पाडून रस्ता तयार केला. त्यामुळे आम्हाला त्रास होतोय असा आरोप केला. तर बंगला मालकाने मात्र हा रस्ता पन्नास वर्षापासून आहे, हजारो लोकं येथून ये जा करतात,बिल्डरने आम्हाला खोटे आश्वासन दिल्याचे सांगितले. चार तास संरक्षक भिंतीवरून महिला आणि पुरुष शेकडो महिला या इमारतीच्या आवारात जमले आणि गोंधळ घातला. (Maharashtra News)

Kalyan News
Nandurbar Zp News : जिल्हा अंतर्गत बदल्यांची प्रक्रिया रखडली; संघर्ष समितीच्यावतीने आंदोलन

कल्याण पूर्व येथील तिसगाव परिसरात सहजीवन रेसिडेन्सी इमारत आहे. या इमारतीला लागून गोपाळनगर येथे प्रभाकर गायकवाड कुटुंबाचा बंगला आहे. सोसायटी आणि गोपाळनगर रहिवासी बंगला मालकामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यावरून वाद सुरू आहेत. बंगला मालक गायकवाड यांनी सोसायटीची संरक्षक भिंत फोडून रस्ता केल्याचा आरोप सोसायटीच्या सदस्यांनी केला. याबाबत सोसायटीच्या सदस्यांनी बिल्डरसह महापालिका तसेच पोलीस (POlice) प्रशासनाला अनेकदा तक्रारी केल्या आहेत. दरम्यान आज सोसायटीच्या आवारात शेकडो रहिवासी जमले आणि त्यांनी रस्ता बंद करणार असल्याचा बोर्ड लावला. सहजीवन रेसिडेन्सीमध्ये रहिवासी आणि गोपाळनगर रहिवासी,बंगला मालक गायकवाड कुटुंबियांमध्ये जोरदार वाद झाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kalyan News
Agriculture News : दोन लाख शेतकऱ्यांना मिळणार नुकसानीची वाढीव मदत

रेसिडेन्सीचे पदाधिकारी श्रीकांत क्षीरसागर यांनी आमची इमारत अधिकृत आहे. बंगला मालकाने इमारतीची संरक्षक भिंत विनापरवानगी तोडली त्या ठिकाणी रस्ता तयार केला. या ठिकाणी दादागिरी केली जाते आम्हाला धमक्या दिल्या जातात. याबाबत आम्ही लोकप्रतिनिधी, पोलिसांकडे गेलो. मात्र अद्याप न्याय मिळाला नसल्याचे सांगितले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही बाजूची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही बाजूने गोंधळ वाढत चालला होता. बंगल्याचे मालक प्रभाकर गायकवाड यांनी आमचा पन्नास वर्षांपूर्वीपासूनचा रस्ता आहे. या ठिकाणाहूनच आम्ही ये-जा करतो. सोसायटीवाले दादागिरी करून रस्ता बंद करू पाहतात असा आरोप केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com