Shere Market Fraud : ३२ जणांकडून उकळले ९ कोटी; शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर ८० टक्के व्याजाचे आमिष

Kalyan News : ३२ जणांकडून उकळले ९ कोटी; शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर ८० टक्के व्याजाचे आमिष
Kalyan Shere Market Fraud
Kalyan Shere Market FraudSaam tv

अभिजित देशमुख

कल्याण : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करण्याच्या नावाखाली वर्षाला ८० टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून ३२ गुंतवणूकदारांची तब्बल ९ कोटी ९ लाख रुपयांची फसवणूक (Fraud) करण्यात आल्याची घटना कल्याणमध्ये उघडकीस आली. (Kalyan) याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात फसवणूक करणाऱ्या दर्शन परांजपे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान दर्शन पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (Breaking Marathi News)

Kalyan Shere Market Fraud
Bhandara News : मासे पकडणे बेतले जीवावर; एकाचा मृत्यू

कल्याण पश्चिमेकडील पार नाका परिसरात मेघश्याम सोसायटीमध्ये दर्शन परांजपे हा इसम राहत होता. पुणे येथे राहणाऱ्या अविनाश कुलकर्णी याच्याशी ओळख झाली. डिसेंबर २०२२ मध्ये दर्शनने अविनाश यांना तुमचे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवतो. तुम्हाला ८० टक्के व्याज मिळेल असे आमिष दाखवलं. अविनाश यांच्याप्रमाणे त्याने आणखी काही जणांना गुंतवणूकीवर ८० टक्के व्याजाचे आमिष दाखवत आपल्या जाळ्यात ओढले. दर्शनने या गुंतवणूकदारांकडून तब्बल ९ कोटी ९ लाख ६४ हजार रुपये उकळले. 

Kalyan Shere Market Fraud
Bhandara News : आनंदानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर; प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू

दर्शन झाला पसार 

आठ महिन्याचा कालावधी उलटूनही पैसे परत न मिळाल्याने गुंतवणूकदारांनी दर्शनला जाब विचारला. सुरुवातीला दर्शन परांजपे याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर दर्शन पसार झाला. गुंतवणूकदारांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी याप्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. गुंतवणूकदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार बाजारपेठ पोलिसांनी दर्शन परांजपे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत याप्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com