Dombivali News: कारवाई टाळण्यासाठी रस्त्यात उभी केली वाहने; अनधिकृत बांधकाम माफियांचा प्रताप

कारवाई टाळण्यासाठी रस्त्यात उभी केली वाहने; अनधिकृत बांधकाम माफियांचा प्रताप
KDMC News
KDMC NewsSaam tv
Published On

अभिजीत देशमुख

कल्याण : डोंबिवली पश्चिमेकडील आरक्षित भूखंडावरील एका अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास महापालिकेचे (Kalyan News) पथक गेले. मात्र कारवाई रोखण्यासाठी अनधिकृत बांधकाम माफियानी शक्कल लढवत गाड्या रस्त्यात उभ्या केल्या. रस्त्यात वाहने उभे केल्याने तब्बल तीन तास महापालिकेची कारवाई खोळंबली. सहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांनी वाहतूक पोलिसांना पाचारण करत या गाड्या टोइंग करून बाजूला काढत (Dombivali) बांधकामावर कारवाई सुरू केली. मात्र कारवाई अर्धवट न करता अशी बांधकामे जमीनदोस्त करण्यात यावीत; अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (Latest Marathi News)

KDMC News
Bajar Samiti Election: मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला; २२ हजार ५६२ मतदार निवडणार बाजार समित्यातील कारभारी

डोंबिवली शहराच्या पश्चिम भागातील कुंभारखान पाडा येथील मॉर्डन इंग्लीश स्कूल आणि दिशांक सोसायटीच्या नजीक असलेल्या आरक्षित भूखंडावर उभारण्यात आलेल्या बेकायदा बांधकामाच्या विरोधात कल्याण डोंबिवली महापालिकेला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी या बांधकामाची तक्रार करत कारवाईची मागणी केली होती. मात्र या बांधकामावर कारवाई केल्यानंतर देखील हे बांधकाम पुन्हा उभे राहत असल्याने पालिका कारवाई करण्यात चालढकल केली जात असल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला होता. त्यानंतर पालिकेकडून कारवाईचे आश्वासन दिले गेले.

KDMC News
Sangli News: गायरान जमिनीवर बांधली घरे; अतिक्रमण काढायला गेलेल्‍या सरपंचास दगडाने मारहाण

वाहन नादुरूस्‍तचे लावले बोर्ड

या अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी पोलीस बंदोबस्तात जेसीबी, ब्रेकर घेत महापालिकेचे पथक त्या ठिकाणी गेले. मात्र हे बांधकाम वाचवण्यासाठी अनधिकृत बांधकाम माफियाने नवीन शक्कल लढवली. त्याने रस्त्यातच दोन ते तीन गाड्या उभ्या करून ठेवल्या होत्या. गाड्यांवर गाड्या बंद पडल्याने या गाड्या उभे आहेत; येणाऱ्या जाणाऱ्या सोसायटी सदस्य त्रास होतोय त्यामुळे क्षमस्व. असे बोर्ड देखील लावण्यात आले होते. रस्त्यातच या गाड्या उभ्या असल्याने जेसीबी व ब्रेकर आत जाऊ शकले नाही. महापालिकेच्या अधिकारी सुहास गुप्ते यांनी वाहतूक पोलीसाना पाचरण केले. वाहतूक पोलिसांनी या गाड्या टोइंग करत बाजूला सारल्या. त्यानंतर महापालिकेने या अनधिकृत इमारतीवर कारवाई सुरू केली. याप्रकरणी प्रभाग क्षेत्र अधिकारी गुप्ते यांनी संबधित इमारत मालका विरोधात विष्णूनगर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल तसेच अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com