Kalubai: मांढरदेव गडावर शुकशुकाट; काळूबाईची विधिवत पूजा संपन्न

काळूबाईच्या जयघाेषात ट्रस्टी व मान्यवरांनी देवीचे दर्शन घेतले.
Mandhardev gad
Mandhardev gadsaam tv
Published On

सातारा : महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दा स्थान असणा-या सातारा जिल्हयातील वाई तालुक्यातील मांढरदेव गडावरील (Mandhardev gad) काळुबाईच्या यात्रेस (kalubai yatra) प्रारंभ झाला आहे. शाकंभरी पौर्णिमे दिवशी म्हणजेच आज या यात्रेचा मुख्य दिवस आहे. (mandhardev yatra kalubai satara Wai)

Mandhardev gad
Marathi Actor Kiran Mane: किरण मानेंना 'मूलगी झाली हाे' मालिकेतून काढल्याचे कारण आलं रसिकांपुढं

कोरोनाच्या (coronavirus) पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने यंदा यात्रा रद्द केली आहे. काळूबाईची परंपरेप्रमाणे पुजा अर्चा करण्यात आली. भाविकांना मांढरगडावर येण्यास सातारा (satara) जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे गड सुना सुना पडला आहे.

मांढरदेव ट्रस्टने देवीच्या मंदीरास (temple) आकर्षक फुलांची सजावट केली आहे. या मंदिरास केलेल्या विद्युत रोषणाईमुळे रात्रीच्या वेळी आणि दिवसा मंदीर परिसर झगमगुन गेला आहे. काळूबाईच्या जयघाेषात ट्रस्टी व मान्यवरांनी देवीचे दर्शन घेतले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com