Marathi Actor Kiran Mane: किरण मानेंना 'मूलगी झाली हाे' मालिकेतून काढल्याचे कारण आलं रसिकांपुढं

ग्रामसभेत कोणताही ठराव झालेला नाही आणि त्याला इतर कोणत्याही सदस्यांचा पाठिंबा नाही असे ससाने यांनी नमूद केले.
marathi actor kiran mane
marathi actor kiran manesaam tv
Published On

सातारा : अभिनेते किरण माने (marathi actor kiran mane) यांना त्यांच्या चुकीच्या वागणुकीमुळे काढण्यात आलं आहे. सध्या किरण माने यांनी या प्रकाराचा राजकीय स्टंट म्हणून वापर करण्यास प्रारंभ केल्याची माहिती मूलगी झाली (mulgi zali ho) हाे या मालिकेचे सातारा जिल्ह्यात लाईन प्राेड्युसर म्हणून काम पाहणारे सचिन ससाणे यांनी दिली.

marathi actor kiran mane
Australian Open 2022: जोकोविचने माघार घेतल्यास असा हाेईल स्पर्धेचा ड्राॅ

अभिनेता किरण माने (kiran mane) यांना मालिकेतून काढल्यानंतर बऱ्याच प्रमाणात जिल्ह्यामध्ये त्यांच्या समर्थनार्थ आणि त्यांच्या विरोधात असे दोन प्रवाह तयार झाले. याच दरम्यान या मालिकेचे शूटिंग जिथे सुरू आहे तेथील गुळुंब (wai) या गावातील सरपंच स्वाती माने यांनी केलेल्या सहीचे एक पत्र व्हायरल झाले. यामध्ये गावांमधून शूटिंग बंद करणार असल्याचे नमूद होते. यावर सरंपच माने यांनी काेणतीही प्रतिकिया दिली नाही. दरम्यान मालिकेचे लाईन प्राेड्युसर सचिन ससाणे यांनी किरण माने यांना काढल्याचं कारण साम टीव्हीशी बाेलतना स्पष्ट केले आहे. माने यांनी काढल्यानंतर त्यांनी राजकीय स्टंट उभा केला असल्याचे स्पष्ट मत ससाणे यांनी व्यक्त केले.

ससाणे म्हणाले किरण माने यांना त्यांच्या वर्तणुकीमुळे मालिकेतून काढून टाकण्यात आले आहे. त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे याआधी तीन वेळा त्यांना समज देण्यात आली होती. त्यांना मालिकेतून काढून टाकल्यानंतर त्यांनी काही पाेस्ट केल्या. त्यातून राजकीय स्टंट निर्माण झाला आहे. या भागात गेली दीड वर्ष शासनाने नियमांचे पालन करुन मालिकेचे चित्रीकरण सुरु आहे. या भागात शूटींग सुरु आहे. काही लाेकांनी एक पत्र व्हायरल केले. त्यास ग्रामसभेचे ठराव नसल्याचे ससाणे यांनी नमूद केले.

edited by : siddhath latkar

marathi actor kiran mane
Mulgi Zali Ho: महाराष्ट्रातील या गावात आजही शुटींग सुरु; सरपंचांची चुप्पी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com